गावितांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, यावर चित्रातली वाघीण शांत का?, शेकापच्या वैशाली सूर्यवंशी यांचा सवाल
By संदीप आडनाईक | Published: August 23, 2023 06:21 PM2023-08-23T18:21:09+5:302023-08-23T18:22:37+5:30
कोल्हापूर : 'मासे खाणाऱ्या महिला चिकन्या दिसतात, त्यांचे डोळे सुंदर होतात, अशा महिलांना पटवणे सोपे जाते' असे आक्षेपार्ह विधान ...
कोल्हापूर : 'मासे खाणाऱ्या महिला चिकन्या दिसतात, त्यांचे डोळे सुंदर होतात, अशा महिलांना पटवणे सोपे जाते' असे आक्षेपार्ह विधान आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी॓॓ केले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी यांनी केली आहे. यावर चित्रातली वाघीण शांत का? यावर त्यांनी आवाज उठवला पाहिजे असाही सवाल त्यांनी केला आहे.
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी संपूर्ण महिला वर्गाचा अपमान केला आहे. ज्या महिला मासे खात नाहीत त्या कुरूप दिसतात असा याचा अर्थ होतो. दुर्गम भागातील महिलांना अजूनही आरोग्य विषयी सुविधा मिळत नाहीत काही महिला अजूनही शारिरीक स्वास्थ्याबाबत अज्ञानी आहेत, त्या गोष्टींबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून नको त्या गोष्टींवर मंत्री ज्ञान पाजळत आहेत असा आरोप त्यांनी केला. महिलांना पटवण्याची भाषा करणाऱ्या वाचाळवीर आदिवासी विकास मंत्री गावित यांनी महिलांचा अपमान केला असून महिला आयोगाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशीही मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे.