विक्रमसिंह घाटगे यांची धोरणे राज्यास दिशा देणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:05+5:302021-07-07T04:31:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांची अनेक ध्येयधोरणे ...

Vikram Singh Ghatge's policies give direction to the state | विक्रमसिंह घाटगे यांची धोरणे राज्यास दिशा देणारी

विक्रमसिंह घाटगे यांची धोरणे राज्यास दिशा देणारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोगनोळी : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांची अनेक ध्येयधोरणे ही राज्यास दिशादर्शक ठरली आहेत. त्याचा लाभ त्यांनी सीमा भागातील शेतकरी वर्गालाही देण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, असे प्रतिपादन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांनी केले. ते कोगनोळी येथे सभासद विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्ती व ऊस विकास योजना अनुदान वितरण प्रसंगी बोलत होते.

स्वागत व प्रास्ताविक शेती अधिकारी रमेश गंगाई यांनी केले. यावेळी कोगनोळी व करनूर सेंटर अंतर्गत सभासद विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्ती ४९१०० रुपये व ऊस विकास योजना अनुदान ९०७८० रुपये वितरित करण्यात आले. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य बाळू कागले, प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे चेअरमन अनिल चौगुले, अंबिका बँकेचे चेअरमन प्रकाश कदम, बाबुराव कगुडे, कृष्णात पाटील यांच्यासह लाभधारक विद्यार्थी, शेतकरी ग्राम पंचायत सदस्य तसेच विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन बाळू म्हाळूमल तर आभार कोगनोळी सेंटरचे ॲग्री ओव्हरसियर अविनाश मगदूम यांनी मानले.

फोटो ओळ : कोगनोळी व करनूर सेंटर अंतर्गत सभासद विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्ती व ऊस विकास योजना अनुदान ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

(छाया : बाबासोा हळिज्वाळे)

Web Title: Vikram Singh Ghatge's policies give direction to the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.