विलासराव पोवार अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूरचे अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:26 AM2021-07-29T04:26:22+5:302021-07-29T04:26:22+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी बैठकीत जाहीर करण्यात आली असून, या ऑनलाइन बैठकीस डॉ. ...
कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी बैठकीत जाहीर करण्यात आली असून, या ऑनलाइन बैठकीस डॉ. हमीद दाभोळकर निरीक्षक म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. विलासराव पोवार यांची अध्यक्ष म्हणून, तर बाळासाहेब मुल्ला यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रारंभी राज्य कार्यकारिणीचे सदस्य सुनील स्वामी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण यांनी पुढील दोन वर्षांसाठी नवनिर्वाचित कार्यकारिणी सुचविली. तिला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. या बैठकीस राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश भोईटे आणि राहुल थोरात उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी कार्याध्यक्ष विनायक चव्हाण होते. राज्य महिला सहभाग सदस्य सीमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले; तर राज्य वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभागाच्या सदस्य सुजाता म्हेत्रे यानी आभार मानले.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : डॉ. विलास पवार (अध्यक्ष), मीरासो मगदूम, नीलम माणगावे, डॉ. एस. के. नेर्ले (उपाध्यक्ष), बाळासाहेब मुल्ला (कार्याध्यक्ष), गीता हसूरकर आणि संजय सुळगावे (प्रधान सचिव), नसिमा अपराध (वार्तापत्र), डॉ. यशवंत चव्हाण (कार्यवाह), शांताराम कांबळे, प्रज्ञा मेटकर (विविध उपक्रम), उज्ज्वला दळवी (कार्यवाह, सांस्कृतिक), प्रफुल्ल आवळे (सहकार्यवाह), किरण गवळी (वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प), बुवाबाजी संघर्ष : प्रवीण आमले, सोशल मीडिया : संजय कळके, महिला सहभाग कार्यवाह : रिनीषा पाटील, सहकार्यवाह : डॉ. प्रमिला भोसले, सुवर्णलता गोविलकर, मानसिक आरोग्य : चंद्रकांत निकाडे, कायदा - कार्यवाह : ॲड. अजित चव्हाण, सहकार्यवाह, ॲड. सयाजी पाटील, जोडीदाराची विवेकी निवड आणि जातिअंत विभाग - कार्यवाह : अमृता जाधव. प्रशिक्षण विभाग : आकाराम कांबळे, सहकार्यवाह : युवा विभाग कार्यवाह - प्रांजल जगजंपी, सहकार्यवाह : हरीश कांबळे, निधीसंकलन - कार्यवाह : रमेश वडणगेकर, सहकार्यवाह : युसूफ तासगावे. सल्लागार समिती : डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रा. डॉ. टी. एस. पाटील, धनाजी जाधव.
----------------------------------
फोटो : 28072021-Kol-vilasrao powar-ans
फाेटोओळी : डॉ. विलास पवार (अध्यक्ष)
280721/28kol_1_28072021_5.jpg
28072021-Kol-vilasrao powar-ansफाेटोओळी : डॉ.विलास पवार (अध्यक्ष)