आमजाई व्हरवडे गावाने कोरोनाला ठेवला वेशीबाहेरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:42+5:302021-05-30T04:20:42+5:30
तीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव निसर्गाच्या कुशीत वसले आहे, गावात फार सुखसुविधा नसल्या, तरी या गावाने कोरोनाला मात्र ...
तीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव निसर्गाच्या कुशीत वसले आहे, गावात फार सुखसुविधा नसल्या, तरी या गावाने कोरोनाला मात्र वेशीच्या बाहेर ठेवण्यात यश मिळवले. पहिल्या लाटेत पाच रुग्ण सापडले होते. त्यापासून गावाने याचा धडा घेत दुसऱ्या लाटेत सुरुवातीपासूनच दक्षता घेत साथीला वेशीच्या बाहेर ठेवले. आरोग्य उपकेंद्रातील सीएचओ अश्विनी सरावणे, आरोग्य सेवक व्ही.एस.कुंभार, प्राजक्ता कडोलकर हे आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येक घराघरात जाऊन सर्वेक्षण करून काळजी घेतली. सरपंच आनंदराव कांबळे, उपसरंपच रुपाली चौगले, माजी उपसरपंच संदीप पाटील, बिराज कांबळे, गुरुनाथ पाटील, उत्तम पाटील, सदस्य धीरज करलकर, सीमा सुतार हेही गावाची काळजी घेत असून गटारी स्वच्छ पाण्याचे नियोजन व गावात स्वच्छता मोहीम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
चौकट
आरोग्यसेवक व्ही. एस. कुंभार सुट्टीवर नाहीत!
आरोग्य सेवक व्ही. एस. कुंभार हे अत्यंत प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रजा बाजूलाच पण सुट्टीच्या दिवशीही कधी त्यांनी सुट्टी घेतली नाही. आमजाई व्हरवडे सिरसे व पिंपळवाडी ही तीन गावे या आरोग्य केंद्राच्या आखत्यारीत येतात प्रत्येक दिवशी प्रत्येक गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन कुंभार विचारपूस करतात, दुसऱ्या लाटेत या तीन गावांत केवळ सिरसे गावात काल एका तरुणाचा अपवाद वगळता या तिन्ही गावांत कोरोनाला गावच्या वेशीवरच ठेवण्यात कुंभार यशस्वी झाले आहेत.
ग्रामस्थांचे सहकार्य व आमचे व आरोग्य विभागाचे नियोजन यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोनाला आजपर्यंततरी गावाच्या वेशीबाहेरच ठेवण्यात यश आले असून अजूनही हा धोका टळला. न ग्रामस्थाच्या पाठबळावर कोरोनाचा गावात शिरकाव होऊ न देण्याचा प्रयत्न करणारच.
आनंदराव कांबळे, सरपंच, आमजाई व्हरवडे