बावड्याच्या गावठाण्यात घुशींता सुळसुळाट
By admin | Published: July 6, 2017 08:39 PM2017-07-06T20:39:30+5:302017-07-06T20:39:30+5:30
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : अनेक घरांच्या भिंती झाल्या खिळखिळ्या
लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : कसबा बावड्यातील मुख्य गावठाणात घुशींचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरांच्या भिंती उकरणे, घरात, अंगणात मुक्तपणे वावरणे व पाळीव मांजरांवर दातांचा आवाज करत हल्ला करणे, असे उद्योग या घुशींकडून वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या घुशींचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. कसबा बावड्याच्या मुळ गावठाणात आजही आरसीसी घरापेक्षा घरांची संख्या जास्त आहे. पूर्वी रात्री उशीरा या घुशी बिळातून बाहेर पडत असे. माणसांची चाहूल व बंद असलेली वीज सुरु केल्यावर या बिळातून आलेल्या घुशी परत बिळात पळून जात असते. परंतु आता वस्तुस्थिती याच्या नेमकी उलटी झाली आहे. घुशी माणसांचा वावर असताना तसेच विजेच्या प्रकाशातच बाहेर पडत आहेत. गल्लीत सध्या आडव्या-तिडव्या घुशी पळताना दिसत आहेत.
मुळ गावठाणातील अनेक घराच्या भिंती या घुशींनी खिळखिळ्या केल्या आहेत. या घुशींचा बंदोबस्त करावा म्हणून लोकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे. परंतू या तक्रारीकडे आरोग्य विभागाचे अद्याप लक्ष गेलेले नाही. चौकट घुशींबद्दल तक्रारी वाढल्या पण.... बावड्यातील गावठाण्यात घुशींचा सुळसुळाट झाला असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या बाबत आपण आरोग्य विभागाकडे वारंवार कळवूनही त्यांनी दखल घेतलेली नाही. या बाबत सभागृहात आवाज उठवणार आहे. अशोक जाधव, नगरसेवक, कोल्हापूर महानगरपालिका