म्हालसवडे येथे आजपासून गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:48+5:302021-07-07T04:29:48+5:30

म्हालसवडे : कोरोनाच्या साथीला आळा घालण्याकरिता म्हालसवडे (ता. करवीर) येथे आज, मंगळवारपासून चार दिवसांकरिता कडक गावबंदी करण्यात आली ...

Village closure at Mhalaswade from today | म्हालसवडे येथे आजपासून गावबंदी

म्हालसवडे येथे आजपासून गावबंदी

Next

म्हालसवडे : कोरोनाच्या साथीला आळा घालण्याकरिता म्हालसवडे (ता. करवीर) येथे आज, मंगळवारपासून चार दिवसांकरिता कडक गावबंदी करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

दूध संकलन व वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार चार दिवसांकरिता बंद करण्यात येणार असून याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या दरम्यान गावातील लोकांना बाहेरगावी जाता येणार नाही व बाहेरील लोकांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना सुरू असल्याचे आढळल्यास व विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याकरिता सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे.

Web Title: Village closure at Mhalaswade from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.