कोरोनामुक्तीसाठी ग्रामसमित्यांनी मरगळ झटकावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:13+5:302021-06-06T04:18:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : ग्रामीण भागात पाच टक्के नागरिक कोरोना निर्बंध पाळत नाहीत, त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढत ...

Village committees should fight for coronation | कोरोनामुक्तीसाठी ग्रामसमित्यांनी मरगळ झटकावी

कोरोनामुक्तीसाठी ग्रामसमित्यांनी मरगळ झटकावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नवे पारगाव : ग्रामीण भागात पाच टक्के नागरिक कोरोना निर्बंध पाळत नाहीत, त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. गावाच्या कोरोनामुक्तीसाठी कोरोना ग्रामसमितीने शिथिलता झटकून काम करावे, असे आवाहन गडहिंग्लज विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील गावांच्या ग्रामभेटीनंतर जुने पारगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड बोलत होत्या.

जयश्री गायकवाड पुढे म्हणाल्या, कोरोना संक्रमण साखळीच्या शेवटच्या टप्प्यात आता आपण आहोत. या टप्प्यात संयम बाळगणे गरजेचे आहे. शहरी भागात ज्या गतीने कोरोना संक्रमण दर कमी होतोय, त्या गतीने ग्रामीण भागात कमी होताना दिसत नाही. कोरोना लवकर हद्दपार करायचा असेल तर निर्बंध पाळावेत. विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्क, सॅनिटाइजर वापरावा व गर्दी टाळावी.

कोरोना स्थानिक ग्रामसमितीचे दुर्लक्ष होत आहे. कोरोना संक्रमित रुग्ण गावातून फिरताना दिसला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. अत्यावश्यक सेवेचे जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. पॉझिटिव्ह रुग्णाच्या प्रथम संपर्कातील व्यक्तींना अहवाल येईपर्यंत अलगीकरणात ठेवावे. ज्या ग्रामसमित्या कोरोना संदर्भात काम करत नाहीत त्यांचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना पाठवणार असल्याचेही जयश्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.

यावेळी वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शहाजीराव पाटील, पोलीस पाटील इंद्रजित पाटील, सरपंच अरविंद पाटील, ग्रामविकास अधिकारी एम. आर. पाटील, तलाठी प्रधान भानसे, राजेंद्र धुमाळ यांच्यासह कोरोना ग्रामसमितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

०५ पारगाव जयश्री गायकवाड

फोटो ओळी : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील कोरोना दक्षता ग्रामसमितीस मार्गदर्शन करताना गडहिंग्लज विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड. सोबत वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे.

( छाया: दिलीप चरणे)

Web Title: Village committees should fight for coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.