पाच लाखांची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी जेरबंद, गारगोटीत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 05:34 PM2022-04-11T17:34:10+5:302022-04-11T17:58:34+5:30
कोल्हापूर : बांधलेली नवीन कमर्शियल इमारत व बंगला याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये दफ्तरी करण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारताना गारगोटीच्या ग्रामविकास ...
कोल्हापूर : बांधलेली नवीन कमर्शियल इमारत व बंगला याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये दफ्तरी करण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारताना गारगोटीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. अमृत गणपती देसाई, (वय- ५५ वर्षे, मुळ रा. पेरणोली, ता.आजरा, सद्या रा. अयोध्या नगर, ३ री गल्ली गडहिंग्लज, ता.गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे या लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने गारगोटीत नवीन कमर्शियल इमारत व बंगला बांधला आहे. याची नोंद ग्रामपंचायतमध्ये दफ्तरी करणेसाठी त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्रे दिली होती. या कामासाठी ग्रामविकास अधिकारी देसाई यांनी तक्रारदाराकडे २० लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती १४ लाख रुपये देण्याचे ठरले. यातील ५ लाखाचा पहिला हप्ता स्विकारताना ग्रामविकास अधिकारी अमृत देसाई यांनी लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात अटक केली.
ही कारवाई , पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पो.हे.कॉ.शरद पोरे, पो.ना.विकास माने, पो.ना.सुनील घोसाळकर, पो.कॉ. रुपेश माने यांच्या पथकाने केली.