म्हालसवडे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:29 AM2021-09-06T04:29:12+5:302021-09-06T04:29:12+5:30
कोल्हापूर : म्हालसवडे (ता. करवीर) येथे कोंढ नावाच्या डोंगरातील शेतात उघड्यावर सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी पोलिसांनी छापा टाकून ...
कोल्हापूर : म्हालसवडे (ता. करवीर) येथे कोंढ नावाच्या डोंगरातील शेतात उघड्यावर सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केली. यावेळी १० हजार ५१६ रुपये किमतीचे रसायन, दारू व साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईत पांडुरंग विलास पाटील (वय २९, रा. खालची गल्ली, म्हालसवडे) याच्यावर गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हालसवडे येथे डोंगरावर पाटील नावाच्या शेतात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून हातभट्टी उद्ध्वस्त केली. त्यावेळी दारू पिणारा ग्राहक पळून गेला. हातभट्टी लावून त्यावर पत्र्याच्या बॅरेलमध्ये रसायन व साहित्य ओतून गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी पत्र्यांचे बॅरेल, प्लास्टिक कॅन, पाइप, प्लास्टिकचा ग्लास, दारू तयार करण्यासाठी लागणारी सल्फेट नावाची पावडर, काळा गूळ आदी १० हजार ५१६ रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. कारवाई पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांच्या पथकाने केली.
फोटो नं.०५०९२०२१-कोल-दारु०१,०२
ओळ : म्हालसवडे (ता. करवीर) येथे डोंगरावर शेतात बेकायदेशीर सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी करवीर पोलिसांनी उद्ध्वस्त केली.
050921\05kol_10_05092021_5.jpg~050921\05kol_11_05092021_5.jpg
ओळ : म्हालसवडे (ता. करवीर) येथे डोंगरावर शेतात बेकायदेशीर सुरु असलेली गावठी दारुची हातभट्टी करवीर पोलिसांनी उद्ध्वस्त केली. ~ओळ : म्हालसवडे (ता. करवीर) येथे डोंगरावर शेतात बेकायदेशीर सुरु असलेली गावठी दारुची हातभट्टी करवीर पोलिसांनी उद्ध्वस्त केली.