एकावर हल्लाः गल्ली बोळातून धावपळ, नानीबाई चिखलीत गव्याचा तब्बल सहा तास थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 07:23 PM2020-03-18T19:23:01+5:302020-03-18T19:24:20+5:30
वेदगंगा नदीवरील बस्तवडे,आणूर दरम्यान असणाऱ्या बंधार्यावरून गव्यांचा कळप मंगळवारी रात्री ११च्या सुमारास जाताना नागरिकांनी पाहिला.यातीलच एक गवा कळप सोडून कौलगेमार्गे चिखलीकडे गेला असल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच सेनापती कापशी, गारगोटी वनविभागाचे अधिकारी तसेच,मुरगुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गव्याला पकडण्यासाठी पथकाचे तब्बल चार तास अथक प्रयत्न सुरू होते.
दत्ता पाटील (म्हाकवे)
नानीबाई चिखली(ता.कागल)येथे भरदुपारी १वा. गव्याने चिखलीतील मगदूम, नुल्ले, आंबी गल्लीत हैदोस घातला.काही तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे तो भितरला होता.त्यांने रुद्ररूप धारण करत समोर येणाऱ्यांच्या दिशेने हल्ला चढविला होता. या गव्याच्या हल्ल्यात कृष्णात मारुती पोवार(वय५५) हे जखमी झाले.त्यांच्या कानाला दु:खापत झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करून त्यांना सीपीआर कडे हालविण्यात आले आहे.येथे तब्बल सहा तास गव्याचा थरार सुरू होता. त्याला पाहण्यासाठी चिखलीसह परिसरातील बघ्यांमुळे पथकाला गव्याला पकडण्यात अडचणी येत होत्या.
वेदगंगा नदीवरील बस्तवडे,आणूर दरम्यान असणाऱ्या बंधार्यावरून गव्यांचा कळप मंगळवारी रात्री ११च्या सुमारास जाताना नागरिकांनी पाहिला.यातीलच एक गवा कळप सोडून कौलगेमार्गे चिखलीकडे गेला असल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच सेनापती कापशी, गारगोटी वनविभागाचे अधिकारी तसेच,मुरगुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गव्याला पकडण्यासाठी पथकाचे तब्बल चार तास अथक प्रयत्न सुरू होते.
म्हाकवेतही गव्याचे दर्शन
बुधवारी सकाळी९वा.म्हाकवे गावच्या पुर्वेकडील शिवारात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांनी गवे फिरताना पाहीले.त्यामुळे या महिला भयभीत होवून घरी परतल्या.तसेच,शेतकरी रात्रीअपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी तसेच,शेतीकामासाठी महिला शेतात जात असतात.परंतु, वारंवार गव्यांचे कळप दिसत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
....म्हणूनच गवे सैरभैर
गत महिन्यात म्हाकवे आणूर मार्गावरून रात्रीचे मोटरसायकलने जाणाऱ्या युवकांवर कळपातील गव्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.जंगलात लावल्या जाणाऱ्या आगी आणि ऊसतोडीमुळे ऊसाचे क्षेत्र कमी होत आहे.त्यामुळे गव्यांना बसायला जागाच नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले असून रात्रंदिवस भरकटताना दिसत आहेत.त्यामुळे वेदगंगा व चिकोत्रा नदीकाठावरील गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.