गाव तिथे क्रीडांगण मोहीम हाती घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:51+5:302021-01-19T04:26:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क दिंडनेर्ली : दक्षिण मतदारसंघातील कोणतेही गाव क्रीडांगणाशिवाय राहू नये यासाठी 'गाव तिथे क्रीडांगण' ही ...

The village will undertake a stadium campaign there | गाव तिथे क्रीडांगण मोहीम हाती घेणार

गाव तिथे क्रीडांगण मोहीम हाती घेणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क दिंडनेर्ली : दक्षिण मतदारसंघातील कोणतेही गाव क्रीडांगणाशिवाय राहू नये यासाठी 'गाव तिथे क्रीडांगण' ही मोहीम हाती घेणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. ते नागाव (ता. करवीर) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपाली विजय नाईक उपस्थित होत्या.

रस्ते, गटर्स, सामाजिक सभागृह तसेच विविध शासकीय योजना ही कामे होतच राहतील; पण तरुण पिढीचे भवितव्य घडवायचे असेल तर गावच्या विकासात क्रीडांगणाचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे आगामी काळात दक्षिण मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील व आपण ग्रामस्थांच्या सहकार्याने दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गावात क्रीडांगण बनविणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने, तरुण मंडळांनी मैदानासाठी लागणाऱ्या जागेसहित प्रस्ताव तयार ठेवावेत, असेही पाटील यांनी सांगितले.

गावातील एक कोटी २७ लाख ३३ हजार रुपये कामांचा प्रारंभ केला.

यामध्ये, ६६ लाख रुपये निधी खर्चून उभारण्यात आलेली पाणी टाकी, ३० लाख रुपये निधीतून गावांतर्गत रस्ते आणि गटर्स, १० लाख रुपये निधीतून गावातील बिरदेव मंदिर परिसर काँक्रिटीकरण करणे.

यावेळी एकनाथ पाटील, माजी उपसभापती सागर पाटील, किरणसिंह पाटील, बाजार समिती सदस्य दिगंबर पाटील, शांतीनाथ बोटे, विश्वास दिंडोर्ले, सरपंच दीपाली विजय नाईक, उपसरपंच कृष्णाबाई राणगे, बापूसाहेब खामकर, संजय नाईक, मेजर राणगे, दिनकर मगदूम, युवराज कोराणे, राजाराम तोरस्कर, तानाजी मगदूम, राहुल कोराणे, संजय मगदूम, उत्तम तोरस्कर, ग्रामसेवक एस. आर. शेंडगे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक विजय नाईक यांनी केले. संदीप कांडर यांनी आभार मानले.

१८ नागाव सतेज पाटील

फोटोओळी : नागाव येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, विजय नाईक, आदी उपस्थित होते.

Web Title: The village will undertake a stadium campaign there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.