आंबेओहोळ संकलन दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबीरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 06:10 PM2020-12-19T18:10:02+5:302020-12-19T18:12:40+5:30

Dam kolhapur - आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील संकलन नोंदवही दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.

Village wise camps from Monday for repairing mango collection | आंबेओहोळ संकलन दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबीरे

आंबेओहोळ संकलन दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबीरे

Next
ठळक मुद्देआंबेओहोळ संकलन दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबीरे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांची माहिती

गडहिंग्लज :आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील संकलन नोंदवही दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.

संकलन दुरुस्तीसाठी प्रकल्पग्रस्तांच्या नियत दिनांकापूर्वीचा ७/१२ व ८-अ, मुलांच्या जन्माचे पुरावे, प्रकल्पग्रस्तांची मुले-मुली व बहिण यांचा विवाह नोंद दाखला, भूसंपादन अधिनियम कलम ४(१) व १२(२) ची नोटीस, बाधित गावातील शिधापत्रिका, अर्जदार व अर्जात नमूद इतर सर्व व्यक्तींचे छायाचित्र ओळखपत्र (आधार कार्ड/ निवडणूक ओळखपत्र/पॅन कार्ड) ६५ टक्के रक्कम जमा केल्याचा भूसंपादन अधिकारी यांचा दाखला, वारस फेरफार /अन्य पुरावा, मृत्यू दाखले ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

३० डिसेंबर,२०२० नंतर संकलन दुरुस्ती अर्ज स्विकारले जाणार नाहीत, त्यामुळे संबंधित प्रकल्पग्रस्तांनी शिबीरास वेळेत उपस्थित राहावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 शिबिरांचे वेळापत्रक असे :

२१ डिसेंबर- वडकशिवाले, २२ डिसेंबर - करपेवाडी, महागोंड व उत्तूर २४डिसेंबर- होन्याळी,२८ डिसेंबर - आर्दाळ, ३० डिसेंबर- हालेवाडी (स्थळ : गावचावडी,वेळ सकाळी ११ ते २)

Web Title: Village wise camps from Monday for repairing mango collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.