कोविड लसीकरणाचे गावनिहाय नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:23 AM2021-03-06T04:23:26+5:302021-03-06T04:23:26+5:30
नेसरी : प्राथमिक आरोग्य केंद्र कानडेवाडीअंतर्गत १२ गावात कोविड लसीकरणाचे गावनिहाय वेळापत्रक जाहीर झाल्याची माहिती कानडेवाडी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ...
नेसरी : प्राथमिक आरोग्य केंद्र कानडेवाडीअंतर्गत १२ गावात कोविड लसीकरणाचे गावनिहाय वेळापत्रक जाहीर झाल्याची माहिती कानडेवाडी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी जाहीर केले असून एकूण ३१८२ जणांचे लसीकरण होणार आहे.
नेसरी विभागातील नेसरीसह कानडेवाडी, सरोळी, अर्जुनवाडी, तळेवाडी, गावठाण, तारेवाडी, वाघराळी, बिद्रेवाडी, बटकणंगले, शिप्पूर, हेळेवाडी या गावांचा यामध्ये समावेश आहे. ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील कोमॉरबीड लाभार्थी व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणार आहे.
गावनिहाय लसीकरण वेळापत्रक असे - नेसरी ५ ते २६ मार्च, वाघराळी - २६ मार्च ते १ एप्रिल, बिद्रेवाडी - ५ ते ७ एप्रिल, कानडेवाडी - ४, ५ व ८ मार्च, सरोळी, ९, १० व १२ मार्च, अर्जुनवाडी १६ ते १८ मार्च, तळेवाडी - १९ व २२ मार्च, गावठाण २३ मार्च, तारेवाडी - २४ मार्च, बटकणंगले - ८ मार्च ते १९ एप्रिल, शिप्पूर २० ते २४ एप्रिल, हेळेवाडी २६ एप्रिल.
संबंधित लाभार्थीनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरपंच, ग्रामसेवक यांनी केले आहे.
नेसरी ग्रामीण रुग्णालयात समुपदेशक कपिल मुळे यांनी पहिली लस टोचून घेतली. तर नेसरी गावचे इनामदार अजितसिंह शिंदे-नेसरीकर यांनी लस घेतली.
---------------------------------------------
फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामीण रुग्णालयात लस घेतल्यानंतर समुपदेशक कपिल मुळे यांनी इतरांनाही लस घेण्याचे आवाहन केले.
क्रमांक : ०५०३२०२१-गड-०६