गव्यांनी दिला ‘ड्रोन’लाही चकवा कोल्हापूर वनखात्याचे रात्रंदिवस हुसकावण्याचे शर्थीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:43 PM2018-11-28T12:43:15+5:302018-11-28T12:45:52+5:30
गवे शहरात घुसू नयेत यासाठी वनखात्याने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले असून, मंगळवारी दिवसभरामध्ये शेतकऱ्यांना एक-दोनदा गवा दिसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वनखात्याच्या ड्रोन कॅमेºयालाही गव्यांनी
कोल्हापूर : गवे शहरात घुसू नयेत यासाठी वनखात्याने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले असून, मंगळवारी दिवसभरामध्ये शेतकऱ्यांना एक-दोनदा गवा दिसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वनखात्याच्या ड्रोन कॅमेºयालाही गव्यांनी चकवा दिला आहे.
गेले काही दिवस जयंती नाला, विन्स हॉस्पिटल, शासकीय गोदामामागील शेती, रमणमळा, पोवार मळा या परिसरात गवे वावरत आहेत. त्यामुळे या परिसरात आणि शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने अधिकारी, कर्मचाºयांची पथके तयार केली असून, दिवसरात्र गस्त घालण्याचे आणि फटाके फोडून, मिरचीचा धूर करून गव्यांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत धान्य गोदाम ते रमणमळ्यापर्यंत शोध घेतला असता पवार मळ्याजवळ गव्यांच्या पायांचे ताजे ठसे पाहावयास मिळाले. तसेच सकाळी ड्रोनचा वापर करून गवे कुठे दिसतात का याचीही पाहणी करण्यात आली. मात्र, गव्यांनी ड्रोनलाही चकवा दिल्याने त्यांचे दर्शन झाले नाही. पवार मळ्याजवळ एका शेतकºयाला सकाळी गवे दिसल्याचे सांगण्यात आले.
उपवनसंरक्षक हणमंतराव धुमाळ, सहायक वनसंरक्षक व्ही. जे. गोसावी, वनक्षेत्रपाल निकम, वनपाल विजय पाटील यांच्यासह अन्य अधिकारी आणि ५० कर्मचारी या सर्व शोधमोहिमेमध्ये सामील आहेत. दिवसा आणि रात्री वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली असून, त्यांच्याद्वारे शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
दोनच गवे की कळप याबाबत संभ्रमावस्था
या संपूर्ण शेतवडीमध्ये दोनच गवे फिरत आहेत की त्यांचा कळप आहे याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे हे गवे कोणत्याही परिस्थितीत शहरात येऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.