विनय कोरे भाजपच्या संपर्कात
By Admin | Updated: July 20, 2014 23:20 IST2014-07-20T23:05:57+5:302014-07-20T23:20:15+5:30
मतदारसंघात जोरदार चर्चा : कार्यकर्त्यांकडूनही वाढता दबाव

विनय कोरे भाजपच्या संपर्कात
विश्वास पाटील -कोल्हापूर
पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार व जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत; परंतु भाजपमध्ये प्रवेशाबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्यावर काहीतरी निर्णय घ्या, असा मोठा दबाव आहे. त्यांनी असा निर्णय घेतल्यास एकाच दगडात अनेक पक्षी मारले जाऊ शकतात. कोरे यांनी त्यासंदर्भात भाजपचे नेते व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भाजपने त्यांना प्रवेश दिल्यास विधानसभेचा गुंताही सुटू शकतो. एकाचवेळी भारत पाटील व सत्यजित पाटील यांचा शिवसेना उमेदवारीचा पत्ता कट होऊ शकतो.
विकासाची दृष्टी, नेतृत्वगुण, चांगले संघटन असूनही कोरे यांचे नेतृत्व सध्या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. पक्ष चालविणे हे आर्थिकदृष्ट्या न झेपणारे बनले आहेच, शिवाय स्वत: त्यांनाही पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात विधानसभेला संघर्ष करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. त्यांच्याच पक्षाचे खंदे कार्यकर्ते भारत पाटील हे स्वाभिमानी किंवा शिवसेनेकडून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील हेदेखील शिवसेनेतूनच प्रयत्नशील आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राज्यात शिवसेना-भाजपचे वारे आहे. राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असल्याने कोरे यांना शिवसेनेत जाण्यात अडचणी आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादीच्या संगतीने झाली; परंतु त्या पक्षानेही त्यांचा सोयीने व गरजेपुरता वापर करून घेतला. आता राष्ट्रवादीचे नाव नको, असे जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांनाही वाटते. स्वतंत्र राहून राजकारण करणे सोपे नाही. काँग्रेसमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तर त्यांना काँग्रेसमध्ये येऊ नका, असाच सल्ला दिला आहे. अशा स्थितीत त्यांच्यापुढे भाजपशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहात नाही.
नितीन गडकरी व कोरे यांचे १९९५पासून घनिष्ट संबंध आहेत. मुंबईत एकाच अपार्टमेंटमध्ये या दोघांचे फ्लॅट असल्याने त्यांची अनेकदा भेट होते. आर्इंची प्रकृती बरी नसल्याने कोरे गेली दीड महिने मुंबईत होते. या काळात त्यांच्या दोन-तीन वेळा भेटी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही कोरे यांचे जुने संबंध आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यातील एखादा खमक्या नेता पक्षात येत असेल, तर भाजपल्
-भाजपला ग्रामीण महाराष्ट्रात पाया घट्ट करण्यासाठी कोरे यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे; परंतु लोकसभेला आकारास आलेल्या महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी आहे.
-स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी व कोरे यांचे हाडवैर आहे. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत कोरे यांनी शेट्टी यांना टोकाचा विरोध केला आहेच, शिवाय ऊसदराच्या आंदोलनावेळीही पहिली उचल जाहीर न करताच वारणा सुरू केल्याचा राग शेट्टी यांच्या मनात आहे.
-त्यामुळे कोरे यांना शेट्टी यांचा विरोध होऊ शकतो; परंतु ते जर भाजपमध्येच प्रवेश करणार असतील, तर मात्र शेट्टी यांना विरोध करण्यात अडचणी
आहेत.ााही ते हवेच आहे. विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे चार आमदार निवडून आले. गेल्या निवडणुकीत ही संख्या दोनवर आली. त्यातीलही मालेगावचे आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जनसुराज्यकडे पन्हाळा पंचायत समिती व नगरपालिकेची सत्ता आहे. परवाच्या नगराध्यक्ष निवडणुकीत सत्ता राखताना कोरे कधी नव्हे ते घामाघूम झाले. जिल्हा परिषद व महापालिकेतही पक्षाचे अस्तित्व जेमतेम आहे. राज्याच्या राजकारणात वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा ध्यास घेऊन स्थापन झालेला हा पक्ष सध्या अस्तित्वासाठीच झगडत आहे.