कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात संशयीत फरार सनातन संस्थेचे साधक विनय बाबुराव पवार (रा. अंब्रज, ता. कराड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याबाबत खात्रीशीर माहिती देणाºयास महाराष्टÑ राज्य शासनाच्यावतीने दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व तपासी अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशयीत विनय पवार आणि सारंग अकोळकर यांची माहिती देणाºयाचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
कोल्हापूरातील ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी अज्ञात मारेकºयांनी गोळीबार केला. त्यापैकी गोविंद पानसरे यांचा २० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्यानंतर या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ची (विशेष तपास पथक) स्थापना करुन तपास करण्यात आला. याच्या तपास अधिकाारी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.
या एसआयटी पथकाने १६सप्टेंबर २०१५ रोजी सनातन संस्थेचा साधक संशयीत समीर विष्णू गायकवाड याला अटक केली. त्याच्याविरोधात दि. १४डिसेंबर २०१५ रोजी न्यायालयात मुळ दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर सनातन संस्थेशी निगडीत असणाºया हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी डॉ. विरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (रा. ५५ सनातन संकुल, सनातन आश्रम, देवद, पनवेल) याच्यासह सनातन संस्थेचा साधक विनय बाबुराव पवार व सारंग दिलीप अकोळकर यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रकरणी डॉ. तावडे याला अटक करुन त्याच्याविरोधात दि. २९ नोव्हेबर २०१६ रोजी न्यायालयात पुरवणी दोषारोप पत्र सादर केले. दरम्यान, या गुन्'ातील संशयीत फरार असणारे विनय पवार आणि सारंग अकोळकर यांना अटक करण्यासाठी विशेष पथकाकडून कसोशीने प्रयत्न करण्यात आले. या दोघांच्या अटकेसाठी सत्र न्यायालयात दि. १३ जुलै २०१७ रोजी सी.आर.पी.सी. ७३ प्रमाणे अजामीनपात्र वॉरंट प्राप्त करुन घेण्यात आले. त्यानंतर या दोघांबाबत माहिती देणाºयास १० लाखाचे बक्षीस देण्याबाबत महाराष्टÑ शासनाकडे प्रस्ताव पाठविला, त्यानुसार राज्य शासनाच्या गृहविभागाकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या फोन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन
महाराष्टÑ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे : ०२०-२५६३४४५९. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर : ०२३१-२६५६१६३. रमेश ढाणे, पोलीस उपनिरीक्षक, विशेष तपास पथक, कोल्हापूर : ९८२३५०२७७७ नियंत्रण कक्ष, कोल्हापूर : १००
दाभोळकर हत्याप्रकरणीही ‘सीबीआय’चेही ५ लाखाचे बक्षीस
अंधश्रध्दा निमुर्लन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणीही ‘सीबीआय’(केंद्रीय अन्वेषण विभाग) आणि ‘एससीबी’(विशेष गुन्हे पथक, मुंबई) यांना विनय पवार आणि सारंग अकोळकर हे हवे आहेत. हे दोघेही फरारी घोषीत केले आहेत. त्यांच्याबाबत माहिती देणाºयास सीबीआय व एससीबी ने ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
यापूर्वी २५ लाखांचे आता १० लाखाचे बक्षीस जाहीर
गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर मारेकºयांची माहिती देणाºया सुमारे २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पण त्यावेळी संशयीतांचे नावे माहिती नव्हती, त्यामुळे आता नावे निश्चित झाली असल्याने आता पवार आणि अकोळकर यांची माहिती देणाºयास १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांनी सांगितले.
तपासात गोपनीयता
हा तपास उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून त्याप्रकरणी न्यायालयामार्फत बारकाईने तपास केला जात आहे. ही तपास कामाची माहिती बाहेर जाणार नाही याची दक्षताही घेतली जात आहे. याप्रकरणी तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगून तपासाबाबत सविस्तर माहिती देण्यास तपास अधिकारी सुहेल शर्मा यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.
मालमत्ता जप्तीचीही कारवाई करणार
पानसरे हत्याप्रकरणी विनय पवार आणि सारंग अकोळकर यांना ७२ सीआरपी नुसार प्रथम अजामीनपत्र वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यांना शोधण्यासाठी बक्षीस जाहीर व त्यानंतर त्यांना फरारी घोषीत करणार, त्यानंतरही ते न मिळाल्यास ८३सीआरपीनुसार त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई टप्प्या-टप्प्याने करणार असल्याचे सांगण्यात आले.
|