Vinayak Mete: मेटेंनी पन्हाळ्यावर स्थापन केली 'शिवसंग्राम संघटना', मंगळवारी भेटीसाठीही जाणार होते
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 04:34 PM2022-08-14T16:34:37+5:302022-08-14T16:36:22+5:30
१९९९ साली त्यावेळी असणारे मंत्री या स्थापन झालेल्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकारीणीमध्ये असल्याने या संघटनेचा दबदबा वाढला होता
कोल्हापूर/पन्हाळा - पन्हाळा आणि शिवसंग्राम चे नेते कै. विनायक मेटे यांचे अतुट नाते होते, शिवसंग्राम ही संघाटना विनायक मेटे, माजी नगराध्यक्ष कै.कमलाकर भोसले, खासदार धैर्यशील माने व मान्यवर यांनी सुरुवातीला पन्हाळा येथे स्थापन करुन मेळावा घेतला असल्याची आठवण माजी नगरसेवक सतीश कमलाकर भोसले यांनी सांगितली.
१९९९ साली त्यावेळी असणारे मंत्री या स्थापन झालेल्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकारीणीमध्ये असल्याने या संघटनेचा दबदबा वाढला होता. कामगार मंत्री हेमंत नाना देशमुख, परीवहन मंत्री सुभाष ठाकरे,पाटबंधारे मंत्री अजीत घोरपडे व पन्हाळा माजी नगराध्यक्ष कमलाकर भोसले हे सर्वच शिवसंग्राम संघटनेचे कार्यकारी मंडळात होते. नुकतेच माजी नगराध्यक्ष कमलाकर भोसले यांचे निधन झाले. त्यारात्री विनायक मेटे यांनी कमलाकर भोसले यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत आपण मंगळवारी प्रत्यक्ष भेटीसाठी येत असलेचे सतीश भोसले यांना सांगितले. अचानक त्यांच्या मृत्युची बातमी आल्यानंतर भोसले कुटुंबाचा आधाराचा आणखी एक हक्काचा दुवा निखळुन पडला.