व्हीआयपी चषक : सहारा, एअर इंडियाची आगेकूच

By Admin | Published: April 21, 2017 12:27 AM2017-04-21T00:27:06+5:302017-04-21T00:27:06+5:30

आकर्षित गोमलने ५० धावा केल्या. ए. जे. नाईट रायडर्सकडून सुयश कुलकर्णीने तीन, सुमित चव्हाण यांनी तीन बळी घेतले.

VIP Cup: Sahara, Air India front | व्हीआयपी चषक : सहारा, एअर इंडियाची आगेकूच

व्हीआयपी चषक : सहारा, एअर इंडियाची आगेकूच

googlenewsNext

कोल्हापूर : मुंबईच्या एअर इंडिया संघाने ए. जे. नाईट रायडर्स संघावर; तर अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्ने प्रदीप स्पोर्टस्चा पराभव करीत व्हीआयपी चषक क्रिकेट स्पर्धेत पुढील फेरी गाठली. शाहूपुरी जिमखाना मैदान येथे गुरुवारी एअर इंडिया व ए. जे. नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना एअर इंडिया संघाने ४० षटकांत ६ बाद २९४ धावा केल्या. यात धीरज जाधवने १०१ चेंडूंत नाबाद ९३ धावा केल्या. अजिंक्य पाटीलने ३४ चेंडंूत नाबाद ६४, तर रौनक शर्माने ५४, आकर्षित गोमलने ५० धावा केल्या. ए. जे. नाईट रायडर्सकडून सुयश कुलकर्णीने तीन, सुमित चव्हाण यांनी तीन बळी घेतले.
उत्तरादाखल, खेळताना ए. जे. नाईट रायडर्स संघ ३२.५ षटकांत सर्वबाद १८७ धावांत गुंडाळला. यात सुमित चव्हाणने एकाकी झुंज देत ६४ चेंडंूत ७३ धावा केल्या. रौनक वर्माने तीन, बद्री आलन व वैभव माळी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. शास्त्रीनगर मैदानात प्रदीप स्पोर्टस् व अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना प्रदीप स्पोर्टस्चा संघ ३८.५ षटकांत सर्वबाद १९५ धावांत गुंडाळला. यात आदित्य शेमाडकरने ४९, तेजस बांदलने २८, जमाल एहसानने २६ धावा केल्या. गोलंदाजी करताना ‘मोगणे सहारा’कडून अनंत तांबवेकरने तीन, वैभव चौगुलेने दोन, भरत पुरोहित व अतीश वरपे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना मोगणे सहाराकडून विशाल कल्याणकरने २६ धावांत ५४ धावा केल्या; तर महेश मस्के यानेही तडाखेबंद फलंदाजी करीत ५५ चेंडंूत ६२ धावा करीत संघाला २८.२ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवून दिला. गोलंदाजी करताना प्रदीप स्पोर्टस्कडून महेश सपकाळ, मंगेश जाधव, प्रतीक छल्लर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: VIP Cup: Sahara, Air India front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.