वीरेंद्र मंडलिक यांचा गोकूळसाठी घर टू घर प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:37+5:302021-04-17T04:23:37+5:30
कोल्हापूरच्या राजकारणात गोकूळ दूध संघाचे महत्त्व अधोरेखित आहे, याच गोकूळच्या निवडणुकीत महाडिक, पी. एन. नरके या सत्ताधारी ...
कोल्हापूरच्या राजकारणात गोकूळ दूध संघाचे महत्त्व अधोरेखित आहे, याच गोकूळच्या निवडणुकीत महाडिक, पी. एन. नरके या सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात मंत्री मुश्रीफ, बंटी पाटील, मंडलिक, कोरे, राजेंद्र पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून तगडे आव्हान उभे केले आहे. विरोधी शाहू आघाडीकडून मंडलिक यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.
वीरेंद्र यांना सहकार राजकारणाचे बाळकडू त्यांना आजोबा, वडिलांकडून मिळाले आहेत. तसेच देशात सहकारात अग्रेसर असणारा सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना याचे ते युवा संचालक म्हणून गेली पाच वर्षे कार्यरत आहेत. जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणून ते शिक्षण संस्थेत ही कार्यरत आहेत. याच अनुभवाच्या शिदोरीवर ते गोकूळच्या रणांगणात सभासदांच्या भेटीगाठी घेत त्यांच्यापर्यंत राजर्षी शाहू शेतकरी विकास पॅनेलचा अजेंडा नेण्यात ते यशस्वी ठरत आहेत. जिल्ह्यातील सर्व ठरावधारकापर्यंत ते आघाडीची भूमिका पोहोचवत आहेत.
फोटो वापरावा
गोकूळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीरेंद्र मंडलिक हे घर टू घर जाऊन सभासदांना आघाडीची भूमिका पटवून देत आहेत.