अतिक्रमण मुक्ती मोहीम: संभाजी राजे शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे रवाना

By उद्धव गोडसे | Published: July 14, 2024 10:20 AM2024-07-14T10:20:19+5:302024-07-14T10:21:47+5:30

भवानी मंडप परिसर दणाणून सोडत कार्यकर्ते विशाळगडावर रवाना झाले.

Vishalgadgarh encroachment liberation campaign: Sambhaji Raje leaves with hundreds of activists | अतिक्रमण मुक्ती मोहीम: संभाजी राजे शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे रवाना

अतिक्रमण मुक्ती मोहीम: संभाजी राजे शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे रवाना

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण मुक्ती मोहिमेसाठी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन कोल्हापुरातून विशाळगडाकडे रवाना झाले. पिपाणी, हलकीचा ठेका, हाती भगवे झेंडे घेऊन 'आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे', हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषणांनी भवानी मंडप परिसर दणाणून सोडत कार्यकर्ते विशाळगडावर रवाना झाले.

विशाळगडगडावरील अनाधिकृत अतिक्रमण विरोधात आज, रविवारी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह कार्यकर्ते विशाळगडावर मार्गक्रमण करण्यासाठी कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरात सकाळपासून जमा झाले. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी याठिकाणी शाहीर आझाद नायकवडी यांनी विशाळगडाच्या इतिहासावर पोवाडा सादर केला.

किल्ले विशाळगडावर कडेकोट पोलीस बंदोबस्त

किल्ले विशाळगडावर कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू नये याबाबत प्रशासन दक्ष आहे. या पार्श्वभूमीवर विशाळगडला पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला आहे. यामुळे गडावर छावणीचे रूप आले होते. गडावर जाणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

शिवभक्तांना शांततेबाबत, सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल रात्री उशिरा जिल्हा प्रशासना मार्फत शिवभक्तांना सहकार्य करण्याबरोबरच छ. संभाजीराजे यांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन आजही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

संभाजीराजेंच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा सवाल

विशाळगडावरील अतिक्रमणांचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही माजी खासदार संभाजीराजेंनी घेतलेली आंदोलनाची भूमिका अनाकलनीय आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढावित अन्यथा हिंदुत्ववादी संघटना वक्फ बोर्डाच्या जागांवर मंदिरे बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला होता.

वाद केवळ अतिक्रमणांचा

विशाळगडावरील वाद दोन धर्मातील नसून तो केवळ अतिक्रमणांचा आहे. दोन्ही धर्मियांची अतिक्रमणे आहेत. सर्वच अतिक्रमणे काढून गड स्वच्छ आणि सुरक्षित करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओ, मेसेज तयार करून ते सोशल मीडियात व्हायरल करू नयेत, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.

Web Title: Vishalgadgarh encroachment liberation campaign: Sambhaji Raje leaves with hundreds of activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.