विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेच्या ठेवी ५५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:56+5:302021-03-08T04:23:56+5:30

मुरगूड येथील कॉ. दत्ता देशमुख सभागृहात पार पडलेल्या बँकेच्या ७३ व्या सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सभेच्या सुरुवातीस ...

Vishwanathrao Patil Murgud Bank deposits 55 crores | विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेच्या ठेवी ५५ कोटी

विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेच्या ठेवी ५५ कोटी

Next

मुरगूड येथील कॉ. दत्ता देशमुख सभागृहात पार पडलेल्या बँकेच्या ७३ व्या सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सभेच्या सुरुवातीस सहकारमहर्षी विश्वनाथराव पाटील व यांच्या प्रतिमेचे पूजन मळगे येथील ज्येष्ठ सभासद आनंदराव पाटील यांच्याहस्ते झाले.

यावेळी चिमगावचे बाळासोा आंगज, मारुती मेंडके, संजय मोरबाळे, राहुल वंडकर यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन सभेचे कामकाज पार पडले.

स्वागत व प्रास्ताविकातून प्रवीणसिंह पाटील यांनी बँकेने राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेताना, बँकेसमोर विविध समस्या निर्माण होत आहेत, त्यामुळे कर्मचारी वर्गाला सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करताना अडचणी येत आहेत. कर्ज देताना किंवा ठेवी ठेवताना विविध नियमांचा वापर करावा लागतो, अशी तक्रार काही सभासद करतात. पण बँक प्रगतीपथावर आणण्यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अहवाल व नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वासराव चौगले यांनी केले. सभेस उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, संचालक विश्वासराव घाटगे, एकनाथ मांगोरे, साताप्पा पाटील, बाळासोा पाटील, गणपती लोकरे, आनंदा पाटील, सुधीर सावर्डेकर, सचिदानंद कुलकर्णी, पांडुरंग पाटील, लक्ष्मी जाधव, रेवती सूर्यवंशी, विजय शेट्टी, एकनाथ पाटील, मारुती कांबळे, बाजीराव इंगळे, बाजीराव रजपूत, संजय हावळ, नंदू दबडे, बाळकृष्ण लोकरे, जहांगीर नायकवडी, रवींद्र जाधव, मारुती घाटगे आदी प्रमुख उपस्थित होतेे.

आभार उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी मानले.

फोटो ओळ :-

मुरगूड ता. कागल येथील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या ७३ व्या सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन प्रवीणसिंह पाटील, व्यासपीठावर संचालक.

Web Title: Vishwanathrao Patil Murgud Bank deposits 55 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.