वीरशैव बँकेतर्फे ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:52+5:302021-06-02T04:18:52+5:30
विश्वास पाटील हे या बँकेचे सभासद असून त्यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बँकेने कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय, ...
विश्वास पाटील हे या बँकेचे सभासद असून त्यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बँकेने कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय, ‘गोकुळ’च्या कामगारांना विविध योजनांमार्फत चांगले अर्थसहाय्य केले आहे. याबद्दल अध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दूध उत्पादक शेतकरी, दूध संकलन आणि वितरण व्यवस्थेला बँकिंग सेवा पुरविण्यात येईल, असे बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी सांगितले. ठाणे जनता बँकेच्या सहयोगाने ‘गोकुळ’च्या सभासद संस्थांच्या सुमारे पाच लाख दूध उत्पादकांना डिजिटल बँकिंग सेवा पुरविण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मांगलेकर यांनी सांगितले. संचालक राजेंद्र थेटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्षा रंजना तवटे, संचालक राजेश पाटील-चंदूरकर, गणपतराव पाटील, डॉ. दिलीप चौगुले, महादेव साखरे, राजेंद्र लकडे, अनिल स्वामी, चंद्रकांत सांगावकर, डॉ. सतीश घाळी, वैभव सावर्डेकर, राजेंद्र माळी, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, प्रताप पडवळ उपस्थित होते. बँकेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर यांनी आभार मानले.
फोटो (०१०६२०२१-कोल-वीरशैव बँक फोटो) : कोल्हापुरातील वीरशैव बँकेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे यांच्या हस्ते गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेजारी अनिल सोलापुरे, रंजना तवटे, गणपतराव पाटील आदी उपस्थित होते.
===Photopath===
010621\01kol_2_01062021_5.jpg
===Caption===
फोटो (०१०६२०२१-कोल-वीरशैव बँक फोटो) : कोल्हापुरातील वीरशैव बँकेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे यांच्या हस्ते गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेजारी अनिल सोलापुरे, रंजना तवटे, गणपतराव पाटील, आदी उपस्थित होते.