व्हिजन इचलकरंजीचे योगदान मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:26+5:302021-09-06T04:28:26+5:30
इचलकरंजी : सामाजिक कार्यात व्हिजनने दिलेले योगदान मोठे आहे. लोकसहभागातून कार्यक्रम कसा घ्यावा, याचे उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे, ...
इचलकरंजी : सामाजिक कार्यात व्हिजनने दिलेले योगदान मोठे आहे. लोकसहभागातून कार्यक्रम कसा घ्यावा, याचे उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे, असे उद्गार आमदार प्रकाश आवाडे यांनी काढले.
येथील शिवाजीराव खवरे भाजी मार्केटमधील व्हिजन इचलकरंजीच्या महावृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या. या वेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्हिजन इचलकरंजीकडून मार्केटमध्ये ३५० वृक्षांचे रोपण करण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यात ७० वृक्षारोपण केले आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीविक्रेते व नागरिकांसाठी पिण्याची व झाडांसाठीही पाण्याची सोय पालिकेमार्फत करून देऊ, असे स्वामी यांनी सांगितले. स्वागत विजय पाटील यांनी व अशोक पाटणी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक सुनील पाटील, मिश्रीलाल जाजू, नगरसेविका किरण खवरे, शिवजी व्यास, उल्हास अतितकर, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.युवराज मोहिते यांनी केले.
फोटो ओळी
०९०५२०२१-आयसीएच-०७
इचलकरंजीतील शिवाजीराव खवरे भाजी मार्केटमधील व्हिजन इचलकरंजीच्या महावृक्षारोपण आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.