विस्थापित होत चाललेल्या माणसाच्या स्मृतींचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 07:05 PM2020-01-11T19:05:13+5:302020-01-11T19:07:13+5:30

चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद माणूस त्याच्या भूतकाळ, मुळापासून, त्याच्या परंपरा, संस्कृतीपासून तसेच त्याची भाषा, त्याचे कुटुंब यापासून ते आजपर्यंत त्याने घेतलेल्या चवीपर्यंत विस्थापित होत चालला आहे. त्याचे हे विस्थापन त्याच्या स्मृतींचे आहे. - प्रा. कृष्णात खोत, साहित्यिक

Visions of the displaced man's memory | विस्थापित होत चाललेल्या माणसाच्या स्मृतींचे दर्शन

विस्थापित होत चाललेल्या माणसाच्या स्मृतींचे दर्शन

Next
ठळक मुद्देएका चक्रात अडकलेला माणूस त्यातच कसा गुरफटला जातो, याचे चित्रण

संदीप आडनाईक ।

कोल्हापूर : पन्हाळ्याच्या मातीतील साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या ग्रामीण जीवनातील रोजचे संघर्षाचे जिणे मांडणाऱ्या गावठाण, रौंदाळा, झडझिंबड आणि धूळमाती या कादंबºया प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला जाहीर झालेला महाराष्ट्र फौंडेशनचा प्रतिष्ठेचा पुरस्कार १२ जानेवारी रोजी पुण्यात देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्न- ग्रामीण मातीतील प्रश्न तुम्ही विषय केले, याची सुरुवात कशी झाली?
उत्तर- पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी या छोट्याशा खेड्यात राहणारा मी. भाताची शेती करणाºया या गावातून रोजच्या जगण्याशी संघर्ष करावा लागायचा. कोणत्याही सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना रोज काय हालअपेष्टा सहन कराव्या लागायच्या, ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. त्यातूनच खरं तर लिखाणाची ऊर्मी मिळाली.

प्रश्न- तुमचे विषय हे प्रामुख्याने ग्रामीण आहेत, ते कसे काय सुचले?
उत्तर- खेड्यांत खूप राजकारण असतं. या राजकारणावर अनेक कथानकं झाली असतील, परंतु या ग्रामीण राजकारणावर अलीकडे कोणीही लिखाण केलेले नाही. त्यामुळे ‘रौंदाळा’ या कादंबरीत गावाकडचा माणूस हा इच्छा असो की नसो, राजकारणात ओढला जातोच. मग तो कसा त्यात गुंतत जातो, मग वाद कसे होतात, याभोवती ही कादंबरी आहे. ‘गावठाण’ कादंबरीत खेड्यात जगणाºया शेतक-याला पाण्यासाठी कशा प्रकारे वणवण फिरावे लागते, याचे भेदक चित्रण आहे.

प्रश्न- रिंगाण बद्दल सांगा?
उत्तर- ‘रिंंगाण’ हे ग्रामीण भागातील भयाण वास्तव आहे. एका चक्रात अडकलेला माणूस त्यातच कसा गुरफटला जातो, याचे चित्रण यात आहे. सद्य काळातील हे भाष्य आहे, असे मला वाटते.

प्रश्न- कादंबºया अनेक विद्यापीठात अभ्यासाला
उत्तर - ‘गावठाण’ ही कादंबरी सोलापूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात शिकवली जाते. माझ्या चारही कादंब-यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. ‘रिंगाण’ निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तब झाले.

Web Title: Visions of the displaced man's memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.