संभाजीराजेंची किल्ले राजगडला भेट

By admin | Published: April 6, 2017 03:36 PM2017-04-06T15:36:56+5:302017-04-06T15:36:56+5:30

विकासकामांची पहाणी : पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक

Visit to the fort of SambhajiRaje to Rajgad | संभाजीराजेंची किल्ले राजगडला भेट

संभाजीराजेंची किल्ले राजगडला भेट

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ६ : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी सकाळी अचानक किल्ले राजगडला अचानक भेट देऊन तेथे सुरु असलेल्या विकास कामांची पहाणी केली. तसेच पुढील कामाचे नियोजनाबाबत पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. दोन दिवसापूर्वी राजगड किल्यावर सापडलेल्या नविन तटबंदीचीही त्यांनी पहाणी केली.

किल्ल्यावरील उत्खनन करताना त्याची कागदोपत्री पूर्तता करुन त्याचा विकास आराखडा तयार करावा, मगच किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे, गड किल्ल्यांसाठी शासनाने वर्ग केलेला निधी हा आर्थिक वर्षे संपण्यापूर्वीच खर्च करावा, पण अपुऱ्या वेळेअभावी घाई-गडबडीत विकासकामे उरकून न होता तो निधी पुन्हा वर्ग करावा, यासाठी पीएलए (पर्सनल लेजर अकौंऊट) ची तरतूद करुन किल्ल्यावर येणाऱ्या महिला दुर्गप्रेमींसाठी स्वच्छतागहाची सोय करावी, कित्येक दिवसापासून रखडलेले राजसदरेचे काम तातडीने पूर्ण करावे, गडावर नियमित स्वच्छता राखावी, तसेच पर्यटकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करावेत अशा वेगवेगळ्या सुचना त्यांनी बैठकीत मांडल्या.

महाराष्ट्रातील किल्ल्यांचे दुरुस्ती आराखडे लवकरात लवकर तयार करुन घ्यावेत त्यासाठी लागणारा वाढीव निधी शासनाकडून मिळवून देऊ अशी ग्वाहीही खा. संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीत दिली.

महाराष्ट्रातील दुर्गप्रेमींच्याकडून खा. संभाजीराजे यांच्याकडे राजगडसंदर्भात आलेल्या काही लेखी सुचनाही त्यानी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिल्या. अशा पध्दतीने पहिलीच बैठक प्रत्यक्ष काम सुरु असलेल्या ठिकाणी झाली आहे.

यावेळी खा. संभाजीराजे यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, रायगड संवर्धन मोहिमेचे प्रसाद दांगट, इतिहास अभ्यासक मालोजीराव जगदाळे, मावळा जवानचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे, बाळासाहेब सणस, झुंझार शिलेदार, समितीचे राहूल पापळ व विविध दुर्गसंघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

सुविधा द्या, पर्यटक वाढवा
तेवीस वर्षे महाराजांचे वास्तव्य असलेला हा गड स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने उत्कृष्ट नमुना आहे. त्यावरील चिलखती बांधणी, बालेकिल्ला, पद्मावती तलाव हे पहाण्यासारखे आहे. याच किल्ल्यावर खासदार संभाजीराजे यांचा अभ्यास दौरा गुरुवारी पूर्ण झाला. राजगड किल्ला खूप उंच आहे. त्यामळे येथे रायगडप्रमाणे सोयी-सुविधा नाहीत, त्यामुळे शिवप्रेमी सोडले तर सामान्य पर्यटक किंवा विदेशी अभ्यासक अभावानेच या गडावर येतात. याच राजगडावर आता पुरातत्व खात्याने काही विकासकामे सुरु केली आहेत. ती योग्य पध्दतीने व्हावीत तसेच किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व जपून त्याचा विकास व्हावा यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: Visit to the fort of SambhajiRaje to Rajgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.