कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी पालकमंत्र्यांची गुरुवारी भेट : प्रशांत चिटणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:30 AM2018-10-16T11:30:48+5:302018-10-16T11:36:46+5:30
कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी (दि. १८) खंडपीठ नागरी कृती समिती व खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे रात्री आठ वाजता भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले.
कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी (दि. १८) खंडपीठ नागरी कृती समिती व खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे रात्री आठ वाजता भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात खंडपीठ नागरी कृती समितीची बैठक झाली होती. यावेळी वकिलांसह पक्षकारांना न्यायालयात रोखणार, असा इशारा दिला होता. दरम्यान, सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांनी १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी सर्किट बेंचबाबत निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम दिला होता.
सोमवारी अध्यक्ष अॅड. चिटणीस व खंडपीठ नागरी कृती समितीचे निमंत्रक व माजी महापौर आर. के. पोवार , बाबा पार्टे आदींनी पालकमंत्री पाटील यांच्या भेटीची वेळ घेतली. त्यांनी गुरुवारी (दि. १८) शासकीय विश्रामगृहात रात्री आठ वाजता भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
या भेटीदरम्यान पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायमूर्ती नरेश पाटील यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.