नेसरी महाविद्यालयास बेंगलोरच्या नॅक कमिटीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:22 AM2021-03-24T04:22:20+5:302021-03-24T04:22:20+5:30

येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाला बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन समितीने (नॅक) ने भेट देऊन पाहणी ...

Visit of NAC Committee of Bangalore to Nesri College | नेसरी महाविद्यालयास बेंगलोरच्या नॅक कमिटीची भेट

नेसरी महाविद्यालयास बेंगलोरच्या नॅक कमिटीची भेट

Next

येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाला बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन समितीने (नॅक) ने भेट देऊन पाहणी केली.

झारखंड येथील कोल्हान विद्यापीठ चालावासाचे कुलगुरू डॉ. गंगाधर पांडा यांनी या समितीचे अध्यक्ष म्हणून, तर समन्वयक व सदस्य म्हणून जम्मू व काश्मीर येथील केंद्रीय विद्यापीठ दोडरम्हा येथील डॉ. फयाज अहमद निका व गुजरात येथील आनंद आटर्स कॉलेज आनंदचे प्राचार्य डॉ. मनोजकमार पटेल यांनी काम पाहिले.

या समितीने २२ व २३ मार्च २०२१ असे दोन दिवस महाविद्यालयाच्या विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती जाणून घेतली. विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून महाविद्यालयाच्या विविध सेवा सुविधा जाणून घेतल्या. संस्थाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी समितीचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. के. आर. पाटील यांनी महाविद्यालयाच्या परिसरासह शैक्षणिक कार्याची माहिती दिली. नेसरी महाविद्यालाचे हे तिसरे राष्ट्रीय मूल्यांकन झाले आहे.

Web Title: Visit of NAC Committee of Bangalore to Nesri College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.