शिवाजी विद्यापीठ, आयसोलेशन, कोरोना केअर सेंटरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:44 AM2020-07-28T10:44:53+5:302020-07-28T10:45:45+5:30
कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यामधील शिवाजी विद्यापीठ वस्तिगृह १, २, ३ व आयसोलेशन येथील कोविड केअर सेंटरला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी भेट दिली.
कोल्हापूर : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यामधील शिवाजी विद्यापीठ वस्तिगृह १, २, ३ व आयसोलेशन येथील कोविड केअर सेंटरला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी भेट दिली.
पॉझिटिव्ह रुग्णांशी त्यांनी संवाद साधला. याठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांबाबत रुग्णांशी चर्चा केली. तसेच तेथील डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफशीही त्यांनी संवाद साधला.
यावेळी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांनी योगा करावा. डिप्रेशन येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी. तसेच आपल्या घरच्यांचीही काळजी घेऊ, त्यांच्यावर लक्ष ठेवू, असे आयुक्तांनी सांगितले.
यानंतर विद्यापीठच्या कँटीन याठिकाणीही आयुक्तांनी भेट देऊन कोविड रुग्णांना देण्यात येत असलेल्या जेवणाचा दर्जा तपासला. यावेळी सहा. आयुक्त अवधूत कुंभार, डॉ. सुशांत रेवडेकर, डॉ. बाबासाहेब लांब, डॉ. संभाजी पाटील, डॉ. रमेश जाधव उपस्थित होते.
आयसोलेशनचे काम चार दिवसांत पूर्ण करा
आयसोलेशनचे नूतनीकरण करण्यात येत असलेल्या रुग्णालयांचीही पाहणी केली. रुग्णांलय दि. १ ऑगस्ट रोजी सुरू होईल यादृष्टीने येथील उर्वरित कामे युद्धपातळीवर तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी शहर अभियंता यांना दिल्या.