माणगांवला अप्पर तहसीलदार पाटील यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:34+5:302021-05-27T04:25:34+5:30
माणगाव येथे वाढते कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी भेट दिले. गावात वाढते कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी ...
माणगाव येथे वाढते कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी भेट दिले.
गावात वाढते कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी संस्थात्मक विलगीकरण कक्षाची स्थापना करण्याबाबत चर्चा केली. ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती यांनी केलेले उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले तथापि सर्वेक्षणामध्ये आढळले की संसर्ग रुग्ण यांना तातडीने संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात यावे, तसेच त्याच्या संपर्कात आलेले नातेवाईक यांना विलीगकरण कक्षामध्ये दाखल करावे अशी सूचना दिली. त्याचप्रमाणे गावांतील रुग्णालयांमध्ये आलेल्या रुग्णांची अँटिजन रॅपिड टेस्ट करून संशयित रुग्ण यांची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडे करावी अशी सूचना दिली.
याप्रसंगी सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य नितीन काबळे, अभिजीत घोरपडे, प्रकाश पाटील, ग्रामविकास अधिकारी बी. बी. राठोड, सर्कल अरुण पुजारी, तलाठी जी. एम. पवार, तलाठी सहाय्यक संजय पाटील उपस्थित होते.