विश्वास पाटील यांची वसंतदादा पाटील स्मृतिस्थळास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:32+5:302021-07-07T04:28:32+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सोमवारी आपल्या कुटुंबासह माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या सांगली येथील स्मृतिस्थळास ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सोमवारी आपल्या कुटुंबासह माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या सांगली येथील स्मृतिस्थळास भेट देऊन अभिवादन केले.
विश्वास पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे योगदान खूप मोलाचे आहे. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात शेती व दुग्ध व्यवसायाला बळकटी देण्याचे काम केले. ज्या शाहू छत्रपती दूध संस्थेच्या माध्यमातून माझ्या ‘गोकुळ’ दूध संघातील वाटचाल सुरू झाली, त्याची स्थापनाही स्वर्गीय दादांच्या आदेशानुसारच झाली. १९७८ ला राज्यात एक गाव एक दूध संस्था होती, मात्र दिवंगत नेते, कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी दादांकडे शिफारस केली. दादांनी तत्काळ आदेश काढले.
यावेळी, सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील, जयश्री मदन पाटील, सांगली महानगरपालिकेचे उपमहापौर उमेश पाटील, तुकाराम पाटील, शंकरराव पाटील, अरविंद पाटील (पद्माळे), विष्णू आण्णा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, संचालक अशोक पाटील, वसंतदादांचे पणतू हर्षवर्धन प्रतीक पाटील, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, करवीरचे पंचायत समिती माजी सदस्य सुनील पाटील, राहुल पाटील, पार्थ पाटील आदी उपस्थित हाेते.
फोटो ओळी : ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी कुटुंबासह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सांगली येथील स्मृतिस्थळास भेट देऊन अभिवादन केले. (फोटो-०५०७२०२१-कोल-गोकुळ)