राधानगरी तालुका संघावर विठ्ठलराव खोराटे व वसंतराव पाटील यांची सत्ता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 08:53 PM2023-04-20T20:53:30+5:302023-04-20T20:53:37+5:30
१५ पैकी १५ जागेवर सताधारी विजयी, संघाच्या स्थापनेपासून प्रथमच निवडणूक लागल्याने या निवडणूक निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
दता लोकरे
सरवडे :राधानगरी तालुका संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या विठ्ठलराव खोराटे व वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहु विकास आघाडीने १५ जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. विरोधी शरद पाडळकर व शुभांगी खोराटे यांच्या नेतृत्वाखालील शिवशंकर परिवर्तन आघाडीचा दारुण पराभव झाला.
संघाच्या स्थापनेपासून प्रथमच निवडणूक लागल्याने या निवडणूक निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. निवडणुकीसाठी १५ जागेसाठी २५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. काल झालेल्या मतदानात संघाच्या ५८६५ व्यक्ती सभासदापैकी ३७७३ सभासदानी मतदानाचा हक्क बजावला होता.तर संस्था गटासाठी १०५ पैकी १०५ मतदाराने हक्क बजावला.आज सकाळी दहा वाजता संस्था गटाचा पहिला निकाल जाहीर झाला. यामध्ये राजर्षी शाहु आघाडीचे वसंतराव पाटील ९२ ,विठ्ठलराव खोराटे ८९,बंडा पाटील ६७ मते घेऊन विजयी झाले. तर व्यक्ती सर्वसाधारण प्रतिनिधी गटातून विलास एरूडकर (३१४२),शिवराज खोराटे ((३१६८)राजाराम देवर्डेकर (३१३६)जालंधर पाटील(३१११),शुभम पाटील(३११२),सर्जेराव बुगडे(३१०१)श्रीकांत साळोखे(३०५७) महिला प्रतिनिधी आनंदी पाटील(३२१२),वैशाली पाटील(३१७३),इतर मागास प्रवर्ग लहु गुरव(३१६८),अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी मधुकर कांबळे (३२१०)विमुक्त,भटक्या जमाती प्रतिनिधी दत्तात्रय धनगर (३१७८) मते घेऊन उमेदवार विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून युसुफ शेख यांनी काम पाहिले.निवडणूक निकाल्यानंतर विजयी उमेदवारासह सर्व समर्थकांनी जल्लोष साजरा केला .विजयी उमेदवार यांनी सरवडेत समाजवादी नेते कै. शिवाजीराव खोराटे व कंथेवाडीत कै.आमदार शंकर धोंडी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
संघाच्या स्थापनेपासून कारभार पारदर्शक व काटकसरीने चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेस ,राष्ट्रवादी व अन्य पक्षानी कधीच हस्तक्षेप केला नाही. मात्र काही आमच्यातील विघ्न संतोषी मंडळीनी निवडणूक लादली मात्र सुज्ञ सभासदांनी व सर्वच पक्षाच्या नेतेमंडळी राजर्षी शाहू आघाडीस प्रचंड मताधिक्याने विजयी केले आणि विरोधकांनी जागा दाखवली - विठ्ठलराव खोराटे, आघाडीचे नेते