विवेकानंद महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेजचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 02:53 PM2019-09-20T14:53:18+5:302019-09-20T14:55:58+5:30

शिवाजी विद्यापीठाचा ३९ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव जयसिंगपूरमधील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये उत्साहात पार पडला. त्यातील विविध कलाप्रकारांमध्ये विवेकानंद महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स कॉलेजच्या (डीआरके कॉमर्स) विद्यार्थी कलाकारांनी वर्चस्व राखले. महोत्सवाचे संयोजक मगदूम कॉलेज आणि विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाने निकाल जाहीर केला.

Vivekananda College, DRK Commerce College | विवेकानंद महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेजचे वर्चस्व

विवेकानंद महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेजचे वर्चस्व

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यशविजेत्यांची मध्यवर्तीसाठी निवड

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ३९ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव जयसिंगपूरमधील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये उत्साहात पार पडला. त्यातील विविध कलाप्रकारांमध्ये विवेकानंद महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स कॉलेजच्या (डीआरके कॉमर्स) विद्यार्थी कलाकारांनी वर्चस्व राखले. महोत्सवाचे संयोजक मगदूम कॉलेज आणि विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाने निकाल जाहीर केला.

विविध १४ प्रकारांतील स्पर्धा या महोत्सवात घेण्यात आल्या. त्यातील कलाप्रकारनिहाय विजेत्या महाविद्यालयांची नावे (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय अशी) वक्तृत्व मराठी : न्यू कॉलेज, राजाराम महाविद्यालय, श्री व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी. हिंदी : डी. आर. माने महाविद्यालय कागल, शिवाजी विद्यापीठ सर्व अधिविभाग, महावीर महाविद्यालय. इंग्रजी : शिवाजी विद्यापीठ सर्व अधिविभाग, डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज, डीआरके कॉमर्स कॉलेज. वादविवाद : दूधसाखर महाविद्यालय बिद्री, विवेकानंद महाविद्यालय, डी. डी. शिंदे सरकार कॉलेज.

सुगमगायन : विवेकानंद महाविद्यालय, शिवशाहू महाविद्यालय सरुड, व्यंकटेश महाविद्यालय. लोकवाद्यवृंद : विवेकानंद महाविद्यालय, डी. आर. माने महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेज. समूहगीत भारतीय : विवेकानंद महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, न्यू कॉलेज. लोककला : दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी, महावीर महाविद्यालय, न्यू कॉलेज.

लोकनृत्य : आजरा महाविद्यालय, शिवशाहू महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय. मूकनाट्य : विवेकानंद महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेज, दूधसाखर महाविद्यालय. लघुनाटिका : विवेकानंद महाविद्यालय, भारती विद्यापीठाचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, डीआरके कॉमर्स कॉलेज.

पथनाट्य : दूधसाखर महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग यड्राव. एकांकिका : भारती विद्यापीठाचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, डीआरके कॉमर्स कॉलेज, शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी. नकला : राजाराम महाविद्यालय, आर्टस, कॉमर्स, सायन्स कॉलेज कोवाड, शिवाजी विद्यापीठ सर्व अधिविभाग. या विजेत्या महाविद्यालयांचा फलटण येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे.
 

 

Web Title: Vivekananda College, DRK Commerce College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.