विवेकानंद घाटगे यांना ‘नीतीप्रज्ञ न्यायरक्षक’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:30 AM2021-02-25T04:30:13+5:302021-02-25T04:30:13+5:30

कोल्हापूर : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी ...

Vivekananda Ghatge awarded 'Ethical Judge' | विवेकानंद घाटगे यांना ‘नीतीप्रज्ञ न्यायरक्षक’ पुरस्कार

विवेकानंद घाटगे यांना ‘नीतीप्रज्ञ न्यायरक्षक’ पुरस्कार

Next

कोल्हापूर : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विवेकानंद घाटगे यांना ‘नीतीप्रज्ञ न्यायरक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शनिवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाच वाजता या पुरस्काराचे वितरण राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे. सन्मानचिन्ह, रोख पाच हजार रुपये आणि दहा हजार रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा प्रा. करूणा मिणचेकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सामाजिक बांधिलकीचे कार्य करणाऱ्या वकिलांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यंदा या पुरस्काराचे पहिले वर्ष आहे. ॲड. विवेकानंद घाटगे यांना निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे असणार आहेत, असे प्रा. मिणचेकर यांनी सांगितले. यावेळी सुरेश केसरकर, दयानंद ठाणेकर, अकबर मकानदार, अधिक चाळके आदी उपस्थित होते.

फोटो (२४०२२०२१-कोल-विवेकानंद घाटगे (पुरस्कार)

Web Title: Vivekananda Ghatge awarded 'Ethical Judge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.