‘विवेकानंद’ची विजेतेपदाची ‘दशकपूर्ती’--मध्यवर्ती युवा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:26 AM2017-09-28T00:26:44+5:302017-09-28T00:28:27+5:30

गारगोटी : कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या ३७व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या सांघिक सर्वसाधारण विजेतेपदावर सलग दहाव्या वर्षी बुधवारी नाव कोरले.

'Vivekananda' winner 'Decade' - Intermediate Youth Festival | ‘विवेकानंद’ची विजेतेपदाची ‘दशकपूर्ती’--मध्यवर्ती युवा महोत्सव

‘विवेकानंद’ची विजेतेपदाची ‘दशकपूर्ती’--मध्यवर्ती युवा महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्दे मुधोजी कॉलेजला वैयक्तिक विजेतेपद; लोकनृत्यात आजरा अव्वलसांघिक विजेतेपदासाठी अभिजितदादा कदम मेमोरियल चषक देऊन गौरविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या ३७व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या सांघिक सर्वसाधारण विजेतेपदावर सलग दहाव्या वर्षी बुधवारी नाव कोरले. फलटणच्या मुधोजी कॉलेजने वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपदासह लोककला प्रकारात विजेतेपद पटकाविले. आजरा महाविद्यालयाने लोकनृत्यामध्ये बाजी मारली.

विजेत्या संघांना श्री मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. विवेकानंद महाविद्यालयाला सांघिक विजेतेपदासाठी अभिजितदादा कदम मेमोरियल चषक देऊन गौरविण्यात आले. मुधोजी महाविद्यालयाला वैयक्तिक स्पर्धेसाठी माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार हा फिरता चषक आणि लोककलेसाठीचा ‘सरदार बाबासाहेब माने’ हा फिरता चषक प्रदान करण्यात आला. लोकनृत्यात बाजी मारणाºया आजरा महाविद्यालयाला ‘सरदार दादासाहेब माने’ हा फिरता चषक देण्यात आला.

स्पर्धानिहाय विजेते
(विजेत्यांची नावे द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ अशी) : लोकनृत्य : विवेकानंद महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण सायन्स् इन्स्टिट्यूट आॅफ सातारा, मुधोजी कॉलेज, देशभक्त आ. ब. नाईक महाविद्यालय चिखली. लोककला : किसनवीर कॉलेज वाई, शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी यड्राव, कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज पलूस, आजरा महाविद्यालय. लोकवाद्यवृंद (प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ) नाईक महाविद्यालय चिखली, विवेकानंद महाविद्यालय, आजरा महाविद्यालय, श्रीमंत भैयासाहेब राजमाने कॉलेज म्हसवड, किसनवीर कॉलेज. पाश्चिमात्य समूहगीत : विवेकानंद कॉलेज, केआयटी, नाईक महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ, आरआयटी.

Web Title: 'Vivekananda' winner 'Decade' - Intermediate Youth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.