एनसीसी शिष्यवृत्तीत ‘विवेकानंद’ ची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:08+5:302021-05-06T04:26:08+5:30

दरवर्षी छात्रसेनेतर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या साला उत्कृष्ट शैक्षणिक आणि एनसीसी उपक्रमामध्ये सक्रियता दर्शविणाऱ्या छात्रांना शिष्यवृत्ती दिली जाते. ...

Vivekananda's bet on NCC Scholarship | एनसीसी शिष्यवृत्तीत ‘विवेकानंद’ ची बाजी

एनसीसी शिष्यवृत्तीत ‘विवेकानंद’ ची बाजी

Next

दरवर्षी छात्रसेनेतर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या साला उत्कृष्ट शैक्षणिक आणि एनसीसी उपक्रमामध्ये सक्रियता दर्शविणाऱ्या छात्रांना शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा एनसीसी ग्रुपमध्ये येणाऱ्या एकूण सहा बटालियनमधून निवडक छात्रांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. त्यात महाविद्यालयातील सिनीयर अंडर ऑफिसर रामचंद्र चव्हाण, केतकी सहस्त्रबुद्धे यांना त्यांच्या दिल्ली येथील अतुलनीय कामगिरीबद्दल बेस्ट कॅडेट स्काॅलरशीप देण्यात आली तर गायत्री तावडे व नीकिता भोसले यांना कॅडेट वेल्फेअर सोसायटी स्काॅलरशीप देण्यात आली. या छात्रांना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे , प्राचार्य डाॅ. आर.आर.कुंभार, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट जितेंद्र भरमगौंडा, कॅप्टन सुनीता भोसले, एनसीसी ग्रुपमधील कर्नल आर.बी.होला, कर्नल तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Vivekananda's bet on NCC Scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.