हत्या करून विवेकाचा आवाज संपत नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 07:03 PM2017-09-06T19:03:52+5:302017-09-06T19:03:58+5:30
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता प्रबोधनाचे काम करणाºया महिला पत्रकारांनाही गोळ््यांचे लक्ष्य बनवण्यात आले आहे. पण विवेकाचा आवाज हत्येने कधीच मरत नसतो, अशाी प्रतिक्रिया कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.
कोल्हापूर : दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता प्रबोधनाचे काम करणाºया महिला पत्रकारांनाही गोळ््यांचे लक्ष्य बनवण्यात आले आहे. पण विवेकाचा आवाज हत्येने कधीच मरत नसतो. या घटनांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे अन्यथा देशात अशी अराजकता माजेल ती थांबवणे शासनाच्याही हातात राहणार नाही अशाी प्रतिक्रिया कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.
बेंगलोर येथील पत्रकार व डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. याबाबत कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते व डाव्या विचारसरणीच्या लोकांनी लोकशाहीबाबत चिंता व्यक्त केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आणि सत्याच्या बाजूने बोलणाºयांना एक एक करुन मारले जात आहे. मात्र अशा गोळ््या झाडून सत्याला कोणी झाकून ठेवू शकत नाही. गेल्या चार पाच वर्षात झालेल्या या हत्यांबाबत सरकारने गांभीर्याने पाऊले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कलबुर्गींच्या मारेकºयांना पकडण्याला सरकारला अद्याप यश मिळालेले नाही या घटनेचा आम्ही काही दिवसांपूर्वी निषेध केला. याविषयावर २६ तारखेला मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर गौरी लंकेश यांच्याशी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येविषयी चर्चा झाली व निषेध सभा आयोजित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बेंगलोरमध्ये भेटणार होतो. पण त्याआधीच एक निर्भीड पत्रकार अशारितीने मारली गेली. त्यांचे मारेकरी कोण आहेत, त्यांची विचारसरणी कोणती हे अद्याप स्पष्ट नसले तरी एखाद्याचे विचार पटत नाहीत म्हणून त्यांना मारणे ही निषेधार्हच बाब आहे.
मेघा पानसरे ,
सामाजिक कार्यकर्त्या
आपण एकतर भित्रे झालो आहोत, स्वत:मध्ये मग्न आहोत किंवा आळशी झालो आहोत असे म्हणावे लागेल. सध्याच्या शासनाला हेच करायचे होते म्हणून सत्तेची अभिलाषा बाळगली होती असे खेदाने म्हणावे लागेल. लोकशाहीत पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे असते. पत्रकार समाजात घडत असलेल्या गैर आणि चुकीच्या गोष्टी प्रकाशात आणून त्यावर अंकुश ठेवण्याचे काम करत असतो. गौरी लंकेश सारख्या पत्रकाराची अशी हत्या होणे म्हणजे लांछनास्पद गोष्ट आहे. शासनाने याकडे अतिशय गांभीर्याने पाहून दोषींना शिक्षा करावी अन्यथा देशात निर्माण होणारी अराजकता रोखण्यापलिक़डे जाईल.
सीमा पाटील,
अंधश्रद्धा निर्मूलन समिती
बेंगलोर, धारवाड, कोल्हापूर, सांगली, सातरा हा भाग जातीयवादी धर्मांध शक्तींच्या टार्गेटवर आहे. पानसरे आणि दाभोलकरांच्या हत्याप्रकरणातील लोकांना सोडल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. समाजसुधारणेचे काम करणाºया पूरुषांसोबत महिलांनीही हत्या करण्यापर्यंत याची मजल गेली आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. या विरोधात आम्ही देशभर इंडिया अगेन्स्ट फॅसीझम ही चळवळ उभी करणार आहोत.
गिरीष फोंडे,
एआयवायएफ