ऑनलाईन सभेद्वारे सभासदांचा आवाज दाबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:39+5:302021-03-08T04:23:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत विषयपत्रिकेवरील विषयांवर हरकत घेतली; मात्र आपणास आडविण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत विषयपत्रिकेवरील विषयांवर हरकत घेतली; मात्र आपणास आडविण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन सभेद्वारे सभासदांचा आवाज दाबल्याचा आरोप बँकेच्या संचालिका लक्ष्मी पाटील यांनी केला, तर अध्यक्षांनी कोअर बँकिंगसह इतर प्रश्नांना बगल दिल्याचा आरोप संचालक प्रसाद पाटील यांनी केला.
शिक्षक बँकेची रविवारी ऑनलाईन सभा झाली. लक्ष्मी पाटील म्हणाल्या, अहवाल सालात मंजुरीपेक्षा जादा खर्च झाला आहे, यासह काही विषयावर अनेकांना मते मांडायची होती. विषयपत्रिकेवरील विषयांना किती सभासदांनी मंजुरी दिली, ही आकडेवारी जाहीर करण्यास सांगितले. मात्र, आपणास आडविण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी मशीन बंद करून सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असला, तरी आगामी निवडणुकीत सभासद तुमचा आवाज दाबतील.
ऑनलाईन सभेमुळे सभासदांना बँकेच्या कारभाराबाबतच्या चर्चेत सहभागी होता आले नाही. बँकेच्या अध्यक्षांकडून कोअर बँकिंग सुविधा अपूर्ण का? थकबाकी का? वाढली? कर्ज बुडीत निधी ४८ लाख वर्ग का? केला? अध्यक्षांचा प्रवास खर्च इतका का? याबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे प्रसाद पाटील यांनी सांगितले.