व्हॉलिबॉलमध्ये नागपूर, पुणे अजिंक्य, बाचणीत राज्य युवक व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:25 AM2017-12-12T00:25:35+5:302017-12-12T00:25:49+5:30
बाचणी : (कागल) महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेच्या मान्यतेने आदर्श क्रीडा मंडळ आयोजित राज्य युवक व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये
बाचणी : (कागल) महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेच्या मान्यतेने आदर्श क्रीडा मंडळ आयोजित राज्य युवक व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात नागपूर विभागाने व मुलींच्या गटात पुणे विभागाने आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करीत राज्य अजिंक्यपद
पटकावले.
गेले तीन दिवस प्रकाशझोतात सुरू असलेल्या या सामन्यांमध्ये सोमवारी अखेरच्या दिवशी मुलांच्या विभागात अंतिम सामन्यात नागपूर व लातूर विभागात अत्यंत चुरशीची लढत झाली.
पाच सेटमध्ये झालेल्या या सामन्यांमध्ये नागपूर संघाने ३-२ आशा फरकाने सामना जिंकत राज्य विजेतेपद पटकावले. लातूर संघाने द्वितीय, तर औरंगाबाद संघाने तृतीय क्रमांक पटकावला.मुलींच्या विभागातील अंतिम सामन्यामध्ये पुणे विभागाने कोल्हापूर विभागाचा ३-० अशा सरळ सेटमध्ये पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला.
कोल्हापूर संघाने द्वितीय, तर नागपूर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण बाचणी गावचे सरपंच निवास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे, उपाध्यक्ष सतीश पाठक, राज्य सचिव नीलेश जगताप, खजिनदार सुनील हांडे, विभागीय सचिव मन्मय पाळणे, उपसरपंच उत्तम पाटील, प्राचार्य ए. आर. खामकर, प्रकाश मांडवकर, संग्राम सडोलकर, दीपक कांबळे, सर्व ग्रा. पं. सदस्य, तसेच पंचक्रोशीतील व्हॉलिबॉलप्रेमी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल कोच प्रा. अजित पाटील यांनी प्रास्ताविक, तर प्रा. व्ही. आर. सडोलकर यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.