कुटुंबाच्या हितासाठी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे : न्यायाधीश आर. आर. पोंदुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 08:29 PM2018-10-06T20:29:56+5:302018-10-06T20:32:33+5:30
कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. पोंदुकले यांनी केले. शुक्रवारी (दि. ५) कौटुंबिक न्यायालयात आयोजित
कोल्हापूर : कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. पोंदुकले यांनी केले. शुक्रवारी (दि. ५) कौटुंबिक न्यायालयात आयोजित केलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.
कोल्हापूर शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची माहिती करून घेणे आणि कौटुंबिक न्यायालयाला स्वयंसेवी संस्थांची मदत कशी होऊ शकेल, याबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी विवाह समुपदेशक स्मिता जोशी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष किरण खटावकर यांनी सामाजिक संस्थेचा सहभाग कसा आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीस जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी नितीन म्हस्के यांच्यासह ३३ स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.