गाववाले सांगत्यात तिथं मत टाकायचं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:33 AM2019-04-09T00:33:17+5:302019-04-09T00:33:23+5:30

कोल्हापूर-उत्तूर 70 कि.मी. समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नोटाबंदी, राफेल घोटाळा, स्ट्राईक हे वृत्तपत्र व दूरचित्रवाणीवरून ...

 Vote here in the village! | गाववाले सांगत्यात तिथं मत टाकायचं...!

गाववाले सांगत्यात तिथं मत टाकायचं...!

googlenewsNext

कोल्हापूर-उत्तूर
70 कि.मी.
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नोटाबंदी, राफेल घोटाळा, स्ट्राईक हे वृत्तपत्र व दूरचित्रवाणीवरून गाजत असलेले मुद्दे सर्वसामान्य मतदारांच्या चर्चेत नसल्याचे वास्तव अनुभवण्यास मिळाले. कोल्हापूर-चंदगड एस.टी.मधून निपाणीपर्यंत व तेथून पुन्हा कोल्हापूर-आजरा बसमधून उत्तूरपर्यंत प्रवाशांना बोलते केल्यानंतर त्यांचे विश्व वेगळेच असल्याचे जाणवले.
चंदगड तालुक्यातील शिरगावच्या साठी ओलांडलेल्या भारती मुळीक यांना ‘काय म्हणते इलेक्शन’असे विचारले तर त्या म्हणाल्या, ‘शिवजयंती हाय जनू, भगवे झेंडे दिसत्यात. उमेदवार कोण माहिती नाही. गाववाले टाक म्हणतील तिथं मत टाकायचं.’
अ‍ॅटोमोबाईलमधील मार्केटिंगचे काम करणारे कोल्हापूरचे विलास डोनेन्यावर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी संधी दिली पाहिजे. त्यांनी थेट खात्यात अनुदान देण्याची योजना काढल्यामुळे मध्येच जिरणारे पैसे बंद झाले. जरा शिस्त लावली आहे. आताच्या खासदारांचे काम चांगले आहे. मात्र, आम्हाला भाजप सरकार पाहिजे आहे.
आजरा तालुक्यातील एरंडोळ येथील सीताराम घुरे यांना लोकसभेबाबत विचारले, तर ते भरमूआण्णा पाटील, अशोक चराटी, प्रकाश आबिटकर ही विधानसभेशी संबंधित नावे घेत राहिले, पण लोकसभेबाबत त्यांनी शेवटपर्यंत एक शब्द तोंडातून काढला नाही. ते कोल्हापुरात हॉटेलमध्ये नोकरीस आहेत.
कामात फरक पडत नाही
सचिन पाटील मूळचा उत्तूरजवळच्या वडकशिवालेचा. पुण्यातून कोल्हापुरात रोजगारासाठी आला आहे. त्याच्या मते, सरकार कुणाचेही आले तरी आपल्या कामात काही फरक पडत नाही. गावात भाजपने चांगले काम सुरू केले आहे, तर राष्ट्रवादीही चांगली आहे, असे त्यांने सांगितले.

Web Title:  Vote here in the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.