मतविभागणी ठरणार डोकेदुखी

By admin | Published: October 1, 2014 10:37 PM2014-10-01T22:37:44+5:302014-10-02T00:16:44+5:30

शेट्टींचा करिश्मा टिकणार का? : मानसिंगराव गायकवाड यांची भूमिका निर्णायक

The vote will be frustrating | मतविभागणी ठरणार डोकेदुखी

मतविभागणी ठरणार डोकेदुखी

Next

राजाराम कांबळे- मलकापूर -शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र येथे विद्यमान आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, कर्णसिंह गायकवाड व ‘स्वाभिमानी’चे अमर पाटील यांच्यात ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. येथे मतविभागणीचा फटका विनय कोरे, तसेच सत्यजित पाटील यांना बसणार आहे. तर मानसिंगराव गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
जनसुराज्य पक्षाचे विद्यमान आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यादिवशी शक्तिप्रदर्शन केले आहे, तर सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सरुड येथे सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’चा आदेश दिला आहे.
लोकसभेला या मतदारसंघातून ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी ४५ हजारांचे मताधिक्य घेऊन निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी ‘स्वाभिमानी’कडून अमर पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. ‘स्वाभिमानी’ची खरी ताकद या निवडणुकीत समजणार आहे. तसेच राष्ट्रवादीची या मतदारसंघावर पकड आहे. राष्ट्रवादीकडून बाबासो पाटील-आसुर्लेकर हे आपले नशीब अजमावत आहेत. कॉँग्रेसचे उमेदवार कर्णसिंह गायकवाड यांनी वाड्या-वस्त्या पिंजून काढून प्रचारात आघाडी घेतली आहे. मनसे, ब्लॅक पँथर, बहुजन समाज पार्टीचे उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत.
येथे पक्षापेक्षा गटा-तटांच्या राजकारणाला चलती आहे. शाहूवाडी तालुक्यात सरुडकर, कर्णसिंह गायकवाड व मानसिंगराव गायकवाड गट मातब्बर आहेत. येथील राजकारण गटाभोवती केंद्रीत असते. गत निवडणुकीपासून आ. विनय कोरे गटाची ताकद वाढू लागली आहे. खुद्द शाहूवाडीतून स्थानिक दोन, तर पन्हाळा तालुक्यातून चार उमेदवार उभा आहेत. पन्हाळ्यातून नाराज असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य भारत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांच्या पक्षाचा उमेदवार उभा असला तरी त्यांचे कार्यकर्ते सेनेच्या प्रचारात आहेत. त्यामुळे मानसिंगराव गायकवाड यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आ. कोरे यांच्यासमोर मतविभागणीचा मोठा प्रसंग उभा आहे, तर एकेकाळी बाबासाहेब पाटील-सरुडकर गटाचे काम करणारे बाबासो पाटील-आसुर्लेकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केल्याने सत्यजित पाटील यांनादेखील मतविभागणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.
शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या रात्रीपर्यंत येथील वातावरण चांगलेच तापणार आहे. मात्र, आदल्या रात्री कोण-कोणाला पाठिंबा देणार? आतून मदत घेणार का? हे शेवटच्या दिवसापर्यंत कोणालाही कळणार नाही. मात्र, खरी लढत दुरंगी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शेवटी उमेदवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The vote will be frustrating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.