Karnatak Vidhan Sabha byelection 2019: महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातही 15 मतदारसंघात पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:09 PM2019-09-21T15:09:08+5:302019-09-21T15:48:39+5:30

महाराष्ट्र राज्यातील 288 जागावर निवडणूक तर कर्नाटकात 15 विधानसभा मतदारसंघावर पोटनिवडणूक होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी कागवाड आणि गोकाक या तीन विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार असून 24 रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे .

Voting in Belgaum district along with Maharashtra | Karnatak Vidhan Sabha byelection 2019: महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातही 15 मतदारसंघात पोटनिवडणूक

Karnatak Vidhan Sabha byelection 2019: महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातही 15 मतदारसंघात पोटनिवडणूक

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राबरोबर बेळगाव जिल्ह्यातही मतदान, 15 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कर्नाटक राज्यातील एकूण 17 आमदारांनी दिला होता राजीनामा

बेळगाव : महाराष्ट्र राज्यातील 288 जागावर निवडणूक तर कर्नाटकात 15 विधानसभा मतदारसंघावर पोटनिवडणूक होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी, कागवाड आणि गोकाक या तीन विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार असून 24 रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे .

कर्नाटक राज्यातील गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, महालक्ष्मी लेआउट, विजयनगर, यशवंतपूर, के. आर. पूर, होसकोठें,चिक्कबल्लापूर, हिरेकरूर, हनसुरु, के.आर.पेठे, राणीबेन्नूर या ठिकाणी मतदान होणार आहे .महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटकातील निवडणुकांची देखील तारीख जाहीर केलेली आहे.

महाराष्ट्रातील 288 तर हरियाणामध्ये 90 जागांवर 21 रोजी मतदान होणार आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. कर्नाटक राज्यातील एकूण 17 आमदारांनी राजीनामा दिला होता त्यापैकी 15 जागांवर निवडणूक होणार आहे.

कर्नाटकातील जनता दल आणि काँग्रेसच्या सतरा आमदारांनी राजीनामा दिला होता .त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांचे निलंबन झाले होते त्या निलंबनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती .मात्र याचिकेकडे लक्ष न देता केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली. हा निलंबित आमदारांना एकप्रकारे धक्का दिला आहे.

Web Title: Voting in Belgaum district along with Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.