बेळगाव लोकसभेसाठी १७ एप्रिलला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:26 AM2021-03-17T04:26:11+5:302021-03-17T04:26:11+5:30

निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे. निवडणुकीची राजपत्रित अधिसूचना (गॅझेट नोटिफिकेशन) मंगळवार, दि. २३ मार्च २०२१ रोजी जारी होईल. उमेदवारी ...

Voting for Belgaum Lok Sabha on April 17 | बेळगाव लोकसभेसाठी १७ एप्रिलला मतदान

बेळगाव लोकसभेसाठी १७ एप्रिलला मतदान

Next

निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे. निवडणुकीची राजपत्रित अधिसूचना (गॅझेट नोटिफिकेशन) मंगळवार, दि. २३ मार्च २०२१ रोजी जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार, दि. ३० मार्च २०२१ ही असणार आहे. अर्जांची छाननी बुधवार दि. ३१ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख शनिवार दि. ३ एप्रिल २०२१ ही असणार आहे. निवडणुकीसाठी शनिवार, दि. १७ एप्रिल २०२१ रोजी मतदान होणार असून त्यानंतर रविवार, दि. २ मे २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया मंगळवार, दि. ४ मे २०२१ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जाणार असून, अन्य सविस्तर माहिती निवडणूक आयोगाचे अंडर सेक्रेटरी संजीव कुमार प्रसाद यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.

Web Title: Voting for Belgaum Lok Sabha on April 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.