चंदगडला १०० टक्के शांततेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:51+5:302021-05-03T04:18:51+5:30

चंदगड : 'गोकुळ'च्या निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यात शंभर टक्के मतदान शांततेत पार पडले. ३४६ पैकी ३४६ ठरावधारकांनी मतदानाचा हक्क ...

Voting in Chandgad was 100 percent peaceful | चंदगडला १०० टक्के शांततेत मतदान

चंदगडला १०० टक्के शांततेत मतदान

Next

चंदगड : 'गोकुळ'च्या निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यात शंभर टक्के मतदान शांततेत पार पडले. ३४६ पैकी ३४६ ठरावधारकांनी मतदानाचा हक्क बजावला.

दुपारी १२ वाजता सत्ताधारी आघाडीचे, पांढरी टोपी व पांढरे मास्क परिधान केलेले ठरावधारक ५ लक्झरी बसेसमधून एकत्र मतदान केंद्रावर आले.

दुपारी दोनच्या सुमारास विरोधी शाहू शेतकरी आघाडीचे ठरावधारक मतदान केंद्रावर आले. त्यांनी पिवळ्या टोप्या व पिवळे मास्क परिधान केले होते.

दुपारनंतर ६ कोरोनाबाधित ठरावधारकांनी पीपीई कीट परिधान करून मतदान केले.

सत्ताधारी आघाडीचे मतदार माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, सम्राट महाडिक, दीपक पाटील, शिवाजीराव पाटील, सचिन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली, तर विरोधी आघाडीचे मतदार आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावर आले.

--------------------------

* चंदगड

एकूण मतदान : ३४६

* झालेले मतदान : ३४६

* टक्केवारी : १०० टक्के

फोटो ओळी :

चंदगड येथे मतदानासाठी एकत्र आलेल्या ठरावधारकांसमवेत माजी मंत्री भरमुअण्णा पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक हेही मतदान केंद्रावर आले होते.

क्रमांक : ०२०५२०२१-गड-०५

----------------------

* फोटो ओळी :

चंदगड येथील कन्या शाळेच्या मतदान केंद्रावर महिला ठरावधारक मतदारांची लागलेली रांग.

क्रमांक : ०२०५२०२१-गड-०७

Web Title: Voting in Chandgad was 100 percent peaceful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.