शाहूवाडीत चुरशीने मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:48+5:302021-05-03T04:18:48+5:30
मलकापूर : सत्ताधारींचा फेटा, तर विरोधकांची टोपी असा वेश परिधान करून शाहूवाडी तालुक्यातील श्री शाहू ...
मलकापूर : सत्ताधारींचा फेटा, तर विरोधकांची टोपी असा वेश परिधान करून शाहूवाडी तालुक्यातील श्री शाहू हायस्कूल शाहूवाडी येथे गोकुळ निवडणुकीसाठी ९९.९९ टक्के मतदान झाले. २८७ मतदारांपैकी २८५ मतदारांनी मतदान केले. एक मतदार आजारी असल्यामुळे मतदानास येऊ शकला नाही. तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी मतदान केंद्रास भेट दिली.
मतदानादिवशी सकाळपासूनच दोन्ही आघाडीकडून योग्य नियोजन करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले जात होते. सकाळच्या सत्रात सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचे मतदार भगवे फेटे परिधान करून मतदान केंद्रावर आले होते. यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील, मा. आमदार सत्यजित पाटील, उमेदवार अनुराधा पाटील, मानसिंगराव गायकवाड, रणवीर गायकवाड मतदारांच्या स्वागताला उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे मतदार आमदार विनय कोरे यांच्यासमवेत मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यांच्यासोबत माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, उमेदवार कर्णसिंह गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील, योगीराज गायकवाड आदी उपस्थित होते. मतदारांना आणण्यासाठी खासगी गाड्यांची सोय केली होती. सत्ताधारी व विरोधी आघाडीकडून मतदारांची बडदास्त ठेवली जात होती. मतदान केंद्रावर दिवसभर नेतेमंडळी थांबून होती.
.....
पूर्ण खबरदारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊनच मतदान केंद्रस्तरावर मतदाराची थर्मल चाचणी तपासणी करूनच मतदान केंद्रात सोडले जात होते.
दरम्यान, मतदान केंद्रास जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी भेट दिली, तर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रावर दिवसभर प्रमुख नेतेमंडळी थांबून होती.
.........
एकूण मतदान २८७
झालेले मतदान २८५
टक्केवारी ९९
०२ शाहुवाडी १,२
फोटो
गोकुळच्या मतदानासाठी विरोधी आघाडीचे नेते आमदार विनय कोरे आपल्या मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन आले.
गोकुळच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर सत्ताधारी गटाच्या मतदारांनी मतदानासाठी लावलेली रांग.