ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:34 AM2017-10-16T00:34:15+5:302017-10-16T00:34:15+5:30

Voting for Gram Panchayats today | ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतींसाठी आज, सोमवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत जिल्ह्यातील २०९५ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. रविवारी (दि. १५) सकाळी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी निवडणूक कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन निवडणूक साहित्यासह त्यांना मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले. थेट सरपंचपदासाठी १२४७ जण, तर सदस्यपदासाठी ८६९९ उमेदवार रिंगणात आहेत. उद्या, मंगळवारी सकाळी १० पासून मतमोजणी होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी निवडणूक अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर मतदान यंत्रा (ईव्हीएम)सह निवडणूक साहित्य देऊन प्रत्येकाला आपापल्या केंद्राकडे पाठविण्यात आले.
मतदानासाठी ५८३२ मतदान यंत्रे (कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट मिळून) सज्ज ठेवण्यात आली आहेत. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, खुल्या वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे १६ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात १७७ संवेदनशील केंद्रे जाहीर करण्यात आली असून, या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
२०९५ मतदान केंद्रांवर कर्मचारी
अधिकारी नियुक्त
तालुका मतदान कर्मचारी क्षेत्रीय
केंद्रे अधिकारी
करवीर २८२ १५५० १०
गगनबावडा ४७ २५० ०३
हातकणंगले ३४४ १९०० ०६
शिरोळ ७८ ६२५ २०
कागल १०५ ६९३ ०८
राधानगरी २०२ १२७० १०
आजरा १०२ ६४३ १०
भुदरगड १२२ ६७६ ०८
पन्हाळा १६० ८०० ०६
शाहूवाडी १४७ ८१० ०६
गडहिंग्लज १३४ ७५० ०७
चंदगड ११९ ६५० ०६

Web Title: Voting for Gram Panchayats today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.