हातकणंगलेत किरकोळ वादावादी वगळता शांततेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:08+5:302021-01-16T04:29:08+5:30

२० गावांची मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे. पाडळी (९०.३ %), मनपाडळे (९०.४७ %), वाठारतर्फ वडगाव (८५.९७%), किणी ( ८१.१७ %), ...

Voting peacefully except for minor disputes in Hatkanangle | हातकणंगलेत किरकोळ वादावादी वगळता शांततेत मतदान

हातकणंगलेत किरकोळ वादावादी वगळता शांततेत मतदान

Next

२० गावांची मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.

पाडळी (९०.३ %), मनपाडळे (९०.४७ %), वाठारतर्फ वडगाव (८५.९७%), किणी ( ८१.१७ %), मिणचे (८९.६६ %), लाटवडे (८८.६६%), खोची (८८.०९ %), वाठारतर्फ उदगाव (९२.४८ %), हालोंडी (९०.५ %), बिरदेववाडी (९४.३५ %), कुंभोज (८२ .११ %), दुर्गवाडी (७९.४ %), नेज (८५.९६ %), माणगाव (८२.३४ %), माणगाववाडी (९४.७९ %), तिळवणी (८६.८१ %), रुई (८४.५५ %), जंगमवाडी (९५.४२ %), कबनूर (७२.०७ %), चंदूर (८१.९८ %) या गावांमध्ये एवढे टक्केवारी मतदान झाले.

गावागावामध्ये ईष्येने मतदान खेचले जात होते, उमेदवार यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. सकाळपासूनच मतदार मतदान करण्यास बाहेर पडत होते. काही गावांत दुपारी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, एकही मतदान चुकू नये यांची खबरदारी सर्व जण घेत होते. मतदारराजाला खुश करण्यासाठी चहा, वडापाव, नाश्ता यांची खास सोय काही गावांत करण्यात आली होती.

हातकंणगले तालुक्यात संवेदनशील म्हणून कुंभोज, किणी, माणगाव व चंदूर, पाडळी यांचा समावेश असल्यामुळे प्रशासनाने मतदान शांततेत व्हावे म्हणून विशेष प्रयत्न केले होते.

..........

कोणाची दांडी उडणार

मतदान झाल्यानंतर रात्री उशिरापर्यत कार्यकर्ते कोणाची बाजी लागणार, तर कोणाची दांडी उडणार याचीच चर्चा करत होते. सोमवार दि.१८ रोजीच्या मतमोजणीनंतरच मतदारांची पसंती कोणाला, हे स्पष्ट होणार आहे.

Web Title: Voting peacefully except for minor disputes in Hatkanangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.