बेळगाव जिल्ह्यात उद्या दुसऱ्या टप्प्यात मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:19 AM2020-12-26T04:19:45+5:302020-12-26T04:19:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : कर्नाटक राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज ...

Voting in the second phase in Belgaum district tomorrow | बेळगाव जिल्ह्यात उद्या दुसऱ्या टप्प्यात मतदान

बेळगाव जिल्ह्यात उद्या दुसऱ्या टप्प्यात मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी : कर्नाटक राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्षांची संख्या मोठी असल्याने दोन्ही पक्षांना त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती, रामदुर्ग, चिक्कोडी, निपाणी, अथणी, कागवाड आणि रायबाग या ७ तालुक्यांतील २१८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. २१८ ग्रामपंचायतींत असलेल्या ३ हजार ५८७ जागांसाठी तब्बल ९ हजार ४७२ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर तालुका पातळीवर प्रशासन सज्ज झाले असून मतदान केंद्रांची उभारणी झाली आहे. निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये भाजप-काँग्रेस व काही ठिकाणी तिसऱ्या आघाडी अशी चुरशीची लढत होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील होऊ घातलेल्या ७ तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये ३३२ उमेदवार बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत. सध्या ९ हजार ४७२ जण रिंगणात असून त्यांच्यासाठी मतदान होणार आहे.

निपाणी पोलिसांकडून पथसंचलन

निवडणूक शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. निपाणी मंडल पोलीस क्षेत्रातील निपाणी शहर, ग्रामीण, बसवेश्वर व खडकलाट या चारही पोलीस स्थानकांचे उपनिरीक्षक व कर्मचारी निवडणुकीतील परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यरत आहेत. सध्या संवेदनशील भागात पथसंचलन करण्यात येत आहे.

फोटो : अकोळ येथे निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले.

Web Title: Voting in the second phase in Belgaum district tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.