बेळगावमध्ये आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:59+5:302021-04-17T04:24:59+5:30

निपाणी : दादा जनवाडे बेळगाव लोकसभा मतदार संघात सध्या पोटनिवडणूक सुरू असून आज शनिवारी यासाठी मतदान होत आहे. सलग ...

Voting today in Belgaum | बेळगावमध्ये आज मतदान

बेळगावमध्ये आज मतदान

Next

निपाणी : दादा जनवाडे

बेळगाव लोकसभा मतदार संघात सध्या पोटनिवडणूक सुरू असून आज शनिवारी यासाठी मतदान होत आहे. सलग ४ वेळा भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात आणि बेळगावात सध्या वेगळेच राजकीय वारे वाहताना दिसत आहेत. मराठी एकीकरण समितीने यावेळी लोकसभेसाठी २५ वर्षीय शुभम शेळके याला उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मरगळ आलेल्या मराठी भाषिकांना नवचैतन्य आले असून यासाठी शुभमची उमेदवारी कारणीभूत आहे. ही उमेदवारी सीमा लढ्याला बळ देणारी आहे.

देशातील सर्वात जुना लढा म्हणून बेळगाव सीमा लढ्याकडे पाहिले जाते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, खा. शरद पवार, अत्रे, नाथ पै, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी तकालीन परिस्थितीत बेळगाव येथील मराठी भाषिकांना नेहमीच बळ दिले आहे. पर्यायाने बेळगावाच्या पाठीशी नेहमीच महाराष्ट्र आला आहे. यापूर्वी म. ए. समितीचे दोन अंकी आमदार निवडून आले आहेत. पण राष्ट्रीय पक्षांनी जोर लावल्याने आणि मराठी भाषिकांत एकी नसल्याने समितीचे आमदार २०१३ च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. यानंतर संपूर्ण बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी येथील मराठी भाषिकांत मरगळ आली होती. पण शुभम शेळके याना उमेदवारी जाहीर होताच तरुणांनी ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतल्याचे चित्र आहे. मतदार संघातील मराठा बहूल भागातून मतदार शुभम याला आर्थिक मदत देत आहेत. तर जागोजागी त्याचे जंगी स्वागत होत आहे.

दोन महिन्यापूवी मनगुत्ती येथील शिवाजी महाराजाचा पुतळा हटविला होता. त्याचबरोबर बेळगाव महानगर पालिकेवर असलेला भगवा ध्वजही काढला होता. यानंतर मराठी भाषिकांच्यात प्रचंड नाराजी होती. अश्या वेळेत ही निवडणूक म्हणजे मराठी भाषिकांना पुन्हा जागे करणारी ठरली आहे. यामुळे या निवडणुकीत शुभम हा भरपूर मते घेईल, अशी अशा आहे. शुभम याला पडलेलं प्रत्येक मत हे सीमा लढ्याला बळ देणारे आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने शुभम शेळके याला सक्रिय पाठिंबा दिला आहे. यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच चुकलंच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. मराठी भाषिक उमेदवाराला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात सभा घेऊ नये, असे आवाहन समितीने केले होते. असे असताना फडणवीस यांनी समितीच्या विरोधात सभा घेतली. यामुळे मराठी भाषिकांत नाराजी पसरली आहे.

Web Title: Voting today in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.