गिधाडे झाली दुर्मिळ
By Admin | Published: May 15, 2017 05:25 PM2017-05-15T17:25:33+5:302017-05-15T17:25:33+5:30
उन्हाळी प्राणी व पक्षी गणनेतील निरिक्षण,सर्वेक्षणात दाजीपूर व राधानगरीचा समावेश
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १५ : दाजीपुर व राधानगरी अभयारण्यातील वन्यजीव क्षेत्रात केलेल्या उन्हाळी पक्षी व प्राणी गणनेत ‘गिधाडे’दुर्मिळ झाल्याचे निरिक्षण वनविभााने नोेंदिविली आहेत.
दिवसा न दिसणारे लेपर्ड कॅट (वाघाटी), गेळा, खवले मांजर, उदमांजर (ब्राऊन सीवेट) हे दुर्मिळ जातीचे प्राण्यांचे अस्तित्व दिसून आले.
चार ते अकरा मे दरम्यान राधानगरी व दाजीपूर या अभयरण्याच्या ३५ हजार १०० हेक्टर (३५१ स्क्वेअर किलोमीटर) क्षेत्रात करण्यात आलेल्या या गणनेत गवे, सांबर, भेकर, रानडूकर, अस्वल, ससे, वानर, शेकरु हे प्राणी प्रत्यक्ष दिसले आहेत. तर ज्या ठिकाणी मानवी अस्तिव राहू शकत नाही अशा ठिकाणी बसविलेल्या कॅमेऱ्याद्वारेही गणना करण्यात आली.
यात बिबट्या, रानकुत्रे, गवे, अस्वले, सांबर , भेकर, चौशिंग, तर लेपर्ड कॅट, गेळा, खवले मांजर, ब्राऊन सीवेट (उदमांजर) यांचे अस्तित्व दिसून आले. या गणनेत दोन्ही वनक्षेत्रात प्रत्यक्ष दिसलेले प्राणी, पाऊलखुणा, विष्टा, झाडावरील ओरखडे याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्याचे काम वन्यजीव विभागाने सुरु केले आहे.
लाईन ट्रॅन्झिट व कॅमेरा टॅपिंग या दोन आधुनिक पद्धतीचा अवलंब गणनेत केला. यात दोन्ही अभयरण्यात वन्यजीव विभागाचे ६५ कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी ही गणना केली. या सर्व क्षेत्रात २४ मंच उभे करण्यात आले होते. यात रात्रंदिवस ही गणना करण्यात आली. घनदाट जंगलात बिबटे, अस्वल, गव्यांचे कळप , रानकुत्रे दिसले. पक्षी गणनेत मोर, धनेश, स्वर्गीय नर्तक, हार्नबेल, पानकोबडे, सुतारपक्षी, बगळे, अशा नियमित पक्षांचे अधिवास दिसून आला. ही गणना मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्राणी व पक्षी गणनेत दाजीपूर व राधानगरी या दोन अभयरण्यातून गिधाडे दुर्मिळ झाली आहेत. यासह नैसर्गिक चक्राप्रमाणे मांसभक्षक प्राणी वाढले की, शाकाहारी प्राण्याचे प्रमाण कमी होते. त्यानूसार यंदा रानगव्यांचे प्रमाण वाढले आहे. गणनेसाठी ६५ कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
- सिताराम झुरे,
विभागीय वन अधिकारी (वन्यजीव)